'या' अनोख्या रणनीतीमुळे बनला नीट टॉपर
नवी दिल्ली (NEET topper Aryan Gupta) : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET पुनर्परीक्षा 2026 चा निकाल जाहीर केला आहे. नीटच्या (EET topper) अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर प्रसिद्ध झालेल्या निकालांमध्ये पंजाबचा आर्यन गुप्ता (Aryan Gupta) आणि हरियाणाचा पांशुल बन्सल (Panshul Bansal) यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. आर्यन गुप्ताने 99.9999 पर्सेंटाइलसह अखिल भारतीय रँक (AIR) 1 मिळवला, तर हरियाणाच्या बन्सलने त्याच पर्सेंटाइलसह AIR 2 मिळवला .
NEET यूजी 2026 परीक्षा 3 मे 2026 रोजी होणार होती, परंतु पेपरफुटीमुळे ती रद्द करण्यात आली. नीटच्या (NEET Result) इतिहासात पहिल्यांदाच पेपरफुटीमुळे संपूर्ण नीट परीक्षा रद्द करावी लागली आहे. त्यानंतर, 21 जून 2026 रोजी नीट यूजी (NEET UG) पुनर्परीक्षा पुन्हा घेण्यात आली. देशभरातून अंदाजे 20 लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली. पंजाबच्या आर्यन गुप्ताने 720 पैकी 715 गुण मिळवून लाखो उमेदवारांना मागे टाकत परीक्षेत अव्वल स्थान पटकावले. देशभरातील नीट यूजी परीक्षेत अखिल भारतीय प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी त्याची रणनीती अनोखी होती.
VIDEO | Punjab's Aryan Gupta topped the NEET-UG for medical admissions, the National Testing Agency announced on Thursday. Visuals of celebrations from Ludhiana.#NEETResults #AryanGupta pic.twitter.com/asl4LCWJfH
— Press Trust of India (@PTI_News) July 16, 2026
आर्यन गुप्ता:
आर्यन गुप्ता (Aryan Gupta) पंजाबमधील लुधियानाचा रहिवासी आहे. त्याचे आई-वडील दोघेही डॉक्टर आहेत. त्याचे वडील डॉ. सचिन गुप्ता आणि आई डॉ. रीनू गुप्ता आहेत. आर्यन गुप्ताचा भाऊ, अखिल गुप्ताने गेल्या वर्षी नीटमध्ये अखिल भारतीय 54 वा क्रमांक मिळवला होता. त्याचे आई-वडील दोघेही डॉक्टर असल्याने, आर्यनने लहानपणापासूनच वैद्यकीय व्यवसायाचे महत्त्व अनुभवले आहे. तथापि, त्याला ऑन्कोलॉजिस्ट (कर्करोगतज्ज्ञ) का व्हायचे होते, हे आर्यनने स्वतःच स्पष्ट केले आहे.
प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर डॉक्टर बनण्याचा निर्णय
पंजाबच्या आर्यन गुप्ताने (Aryan Gupta) दिलेल्या मुलाखतीत सांगितले, "मी खूप मेहनत केली, मला झोप लागत नव्हती, पण आता हे सर्व अविश्वसनीय वाटते. हे सर्व माझ्यासाठी स्वप्नासारखे आहे. मी तिसऱ्या इयत्तेत असताना माझ्या आजीचे कॅन्सरने निधन झाले आणि तेव्हाच मी डॉक्टर बनण्याची शपथ घेतली."
16-17 तास अभ्यास करून आर्यन गुप्ता बनला नीट टॉपर
आर्यन गुप्ताने (Aryan Gupta) स्पष्ट केले की, त्याला ऑन्कोलॉजिस्ट (कर्करोगतज्ज्ञ) बनायचे आहे. तो म्हणाला की, आयुष्यात त्याला अजून खूप काही करायचे आहे, पण आता मला समाधानी वाटत आहे. आर्यनने सांगितले की तो (NEET Result) नीट परीक्षेच्या तयारीसाठी दिवसातून 16-17 तास अभ्यास करायचा. मी माझ्या नोट्स तयार करायचो.