13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय सरचिटणीसांची नियुक्ती
नवी दिल्ली (BJP New Team) : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) संघटनात्मक पातळीवर मोठा फेरबदल केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी 17 ऑगस्ट रोजी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. या नव्या टीममध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि 8 राष्ट्रीय सरचिटणीसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नव्या टीममध्ये (BJP New Team) राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, डी. पुरंदेश्वरी, रेखा वर्मा, वर्षाबेन नरेंद्रभाई दोशी, भारती प्रवीण पवार, मनप्रीत सिंह बादल, लाल सिंह आर्य, एम. नागराजा, तारिक मन्सूर आणि मधुचंद्र कर यांचा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून समावेश करण्यात आला आहे.
भारतीय जनता पार्टी की राष्ट्रीय टीम के सभी नवनियुक्त पदाधिकारियों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।
— Nitin Nabin (@NitinNabin) August 17, 2026
अनुभव और ऊर्जा से समृद्ध यह टीम आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के मार्गदर्शन में संगठन को नई गति प्रदान करेगी। मुझे पूर्ण विश्वास है कि टीम के सभी सदस्य, कार्यकर्ता भाव… pic.twitter.com/bvSxIZIRtW
महाराष्ट्रातील विनोद तावडे आणि भारती पवार यांना मोठी जबाबदारी
महाराष्ट्रातील विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी, तर भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या दोन्ही नेत्यांना भाजपच्या राष्ट्रीय संघटनेत महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. (BJP New Team) राष्ट्रीय सरचिटणीसपदासाठी विनोद तावडे, सुनील बन्सल, स्मृती इराणी आणि बिप्लब कुमार देब यांच्यासह आठ नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पीयूष गोयल यांच्याकडे राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बी. एल. संतोष यांची राष्ट्रीय संघटन सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक मजबूत करण्यासाठी हा फेरबदल केल्याचे मानले जात आहे. (BJP New Team) नव्या पदाधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
BJP chief Nitin Nibin announces names of new office bearers.
— ANI (@ANI) August 17, 2026
Vasundhara Raje Scindia, Tirath Singh Rawat, Ram Madhav, Baijyant Jay Panda, D Purandeshwari, Rekha Verma, Varshaben Narendrabhai Doshi, Bharti Pravin Pawar, Manpreet Singh Badal, Lal Singh Arya, M. Nagaraja, Tariq… pic.twitter.com/dnPE95CDVY