रेणापुर काँग्रेस जागरण

दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी रेणापुरात काँग्रेसचे जागरण गोंधळ!

Renapur Congress Jagran: तळपत्या उन्हात हलगी व झांज वाजवत सुकत चाललेले सोयाबीन उपटून थेट तहसीलवर नेत काँग्रेसच्या वतीने रेणापुरात मंगळवारी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.

दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी रेणापुरात काँग्रेसचे जागरण गोंधळ!

Renapur Congress Jagran

रेणापूर (Renapur Congress Jagran) : तळपत्या उन्हात हलगी व झांज वाजवत सुकत चाललेले सोयाबीन उपटून थेट तहसीलवर नेत काँग्रेसच्या वतीने रेणापुरात मंगळवारी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. कोरडा दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.  रेणापूर तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत.  अनेक भागात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून नदी-नाले, तलाव व जलसाठेही पुरेशा पावसाअभावी कोरडे पडत आहेत. 

रेणापूर तालुक्यात (Renapur Congress Jagran) यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत.  अनेक भागात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून नदी-नाले, तलाव व जलसाठेही पुरेशा पावसाअभावी कोरडे पडत आहेत.  यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी, पिकांचे झालेले नुकसान आणि पावसाच्या लहरीपणामुळे निर्माण झालेल्या संकटाबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

शेतकरी अडचणीत असताना शासनाने केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष शेतावर जाऊन परिस्थिती पाहावी आणि तातडीने मदत जाहीर करावी. शिवाय पीकच राहिले नाही, मग पीक पाहणीचा अट्टाहास कशासाठी? अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. या आंदोलनामुळे रेणापूर तहसील कार्यालय परिसरात काही काळ वातावरण आंदोलनमय झाले होते. यावेळी पोलीस बंदोबस्त कडेकोट ठेवण्यात आला होता. (Renapur Congress Jagran) प्रशासनाने तालुक्यातील पावसाची स्थिती, पिकांची अवस्था आणि शेतकऱ्यांचे नुकसान यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.

पोतराजाची भूमिका लक्षवेधी!
पारंपरिक पद्धतीने जागरण-गोंधळ करून शासन व प्रशासनाचे लक्ष तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीकडे वेधण्यात आले. यावेळी पोतराजच्या भूमिकेत रहीम पठाण यांची वेशभूषा आकर्षक व लक्षवेधी ठरली. या आंदोलनात सभापती उमाकांत खलंग्रे, शेषराव हाके, रहीम पठाण, ऍड. शिरीष यादव, हणमंत पवार, गंगासिंह कदम, गजेंद्र चव्हाण, प्रदीप राठोड, विलास भोसले, विश्वजीत पाटील, सचिन मोठेगावकर, दिपक जगदाळे, अजय चक्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते.

टैग्स: Renapur Congress Jagran