आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून वर्षा गायकवाडांचा सरकारवर हल्लाबोल
मुंबई (Congress MP Varsha Gaikwad) : नाशिकहून शेकडो किलोमीटरची पायपीट करत आपल्या मागण्यांसाठी मुंबईत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईवरून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली जात असून, मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात पोलिसांनी विनावॉरंट प्रवेश करून विद्यार्थिनींना ताब्यात घेतल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबई काँग्रेस कार्यालयात पोलिसांच्या कारवाईचा निषेध
पहाटे चार वाजता मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात आणि सकाळी सातच्या सुमारास दादर येथील ‘टिळक भवन’मध्ये पोलिसांनी कारवाई केल्याचा दावा (Congress MP Varsha Gaikwad) गायकवाड यांनी केला. विद्यार्थिनींना शौचालयातून बळजबरीने बाहेर काढून अटक करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या कारवाईवर संताप व्यक्त करताना, ‘महाराष्ट्रात नेमके कायद्याचे राज्य आहे की फडणवीस सरकारचे जंगलराज सुरू आहे?’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘राजकीय कार्यालयात विनावॉरंट घुसखोरी’ केल्याचा आरोप
मुंबई काँग्रेस कार्यालयात झालेल्या पोलीस कारवाईनंतर आयोजित पत्रकार परिषदेत गायकवाड (Congress MP Varsha Gaikwad) यांनी सरकारवर विविध मुद्द्यांवरून निशाणा साधला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या, आश्रमशाळांमधील कथित दुरवस्था, आझाद मैदानातील आंदोलनांवरील कारवाई आणि मुंबई एनएसयूआय अध्यक्षांच्या अटकेचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
पोलिसांना राजकीय कार्यालयांमध्ये अशा प्रकारे प्रवेश करण्याचा अधिकार असेल, तर ‘आम्हीही उद्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी घुसू’, असा इशाराही गायकवाड यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सरकारने संवेदनशील भूमिका घ्यावी आणि त्यांच्या मागण्यांवर चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी गायकवाड (Congress MP Varsha Gaikwad) यांनी केली. पोलिसांच्या कारवाईची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.