देऊळ बंद 2

देऊळ बंद 2 सुपरहिट! बॉक्स ऑफिसवर अजूनही वर्चस्व

Deool Band 2: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘देऊळ बंद 2’ ची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि मोहन जोशी, स्नेहल तरडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रम

देऊळ बंद 2 सुपरहिट! बॉक्स ऑफिसवर अजूनही वर्चस्व

Deool Band 2

 

19 दिवसांत 75 कोटींचा टप्पा पार

मुंबई (Deool Band 2) : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘देऊळ बंद 2’ ची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि मोहन जोशी, स्नेहल तरडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कामगिरी करत अवघ्या 19 दिवसांत 70 कोटींचा टप्पा पार केला आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चित्रपटाची घोडदौड अजूनही कायम आहे.

ट्रेड रिपोर्ट्सनुसार, ‘देऊळ बंद 2’ ने 19 व्या दिवशी सुमारे 1.15 कोटी रुपयांची नेट कमाई केली असून, (Deool Band 2) चित्रपटाची एकूण भारत नेट कमाई 60.90 कोटी रुपये, तर भारत ग्रॉस कमाई 71.62 कोटी रुपये इतकी झाली आहे.

चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 30 कोटींहून अधिक कमाई करत दमदार सुरुवात केली होती. (Deool Band 2) दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व कायम राखले. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार 17 दिवसांतच चित्रपटाची नेट कमाई 56.60 कोटी रुपयांवर पोहोचली होती.

दरम्यान, महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार ‘देऊळ बंद 2’ ने जगभरात 70.40 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली असून, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक विक्रम धोक्यात आणले आहेत. चित्रपटाचा वेग पाहता आगामी दिवसांत हा चित्रपट आणखी मोठा टप्पा गाठण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, सुमारे 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या (Deool Band 2) चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात खर्च वसूल केला होता. आता तो 2026 मधील सर्वाधिक यशस्वी मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. प्रेक्षकांकडून मिळणारी सकारात्मक प्रतिक्रिया आणि तोंडी प्रसिद्धीचा फायदा चित्रपटाला मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्रपट विश्लेषकांचे मत आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शन (19 दिवस)

  • भारत नेट : ₹60.90 कोटी
  • भारत ग्रॉस : ₹71.62 कोटी
  • जागतिक कमाई : ₹70.40+ कोटी (रिपोर्टनुसार)

मराठी चित्रपटसृष्टीसाठी ‘देऊळ बंद 2’ (Deool Band 2) हे आणखी एक मोठे यश ठरत असून, पुढील काही दिवसांत हा चित्रपट नवीन विक्रम प्रस्थापित करतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

'देऊळ बंद 2'च्या यशामागे शाहरुख खानचीही मोठी भूमिका; ४२ लाखांचे DCP बिल माफ करून दिला दिलासा

'देऊळ बंद 2'च्या यशामागे शाहरुख खानचीही मोठी भूमिका; ४२ लाखांचे DCP बिल माफ करून दिला दिलासा

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा 'देऊळ बंद 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवत मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या पाच चित्रपटांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.

Jun 19, 2026
'देऊळ बंद 2' ठरला ब्लॉकबस्टर! चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शकांची 'दैनिक देशोन्नती'ला सदिच्छा भेट

'देऊळ बंद 2' ठरला ब्लॉकबस्टर! चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शकांची 'दैनिक देशोन्नती'ला सदिच्छा भेट

Deool Band 2: शेतकर्‍यांच्या आत्महत्यांना आळा बसावा, या हेतूने निर्माण केलेला 'देऊळ बंद-2' हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघावा, असे आवाहन या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माते कैलास वाणी

Jun 10, 2026
“‘आता परीक्षा देवाची’… नेमकं काय घडणार ‘देऊळ बंद २’मध्ये?”

“‘आता परीक्षा देवाची’… नेमकं काय घडणार ‘देऊळ बंद २’मध्ये?”

मराठी चित्रपटसृष्टीत गाजलेल्या ‘देऊळ बंद’च्या यशानंतर आता त्याचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ‘देऊळ बंद २: आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट २१ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Apr 03, 2026