वाहतूक नियम कारवाई

वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर आता कडक कारवाई; ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द?

Enforcement of Traffic Rules: वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेपर्वा वाहनचालकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत. चालकांवर पेनल्टी पॉईंट्सच्या आधारे कारवाई केली

वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर आता कडक कारवाई; ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द?

Traffic Rules

नवी दिल्ली/ मुंबई (Enforcement of Traffic Rules) : वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेपर्वा वाहनचालकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनचालकांच्या परवान्यासाठी लवकरच ‘ग्रेडेड पॉईंट्स-बेस्ड सिस्टीम’ लागू करण्याचे संकेत दिले आहेत. या प्रणालीअंतर्गत वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांवर पेनल्टी पॉईंट्सच्या आधारे कारवाई केली जाणार आहे.

66 व्या ‘सियाम’ (SIAM) वार्षिक परिषदेत बोलताना गडकरी यांनी (Traffic Rules) रस्ते सुरक्षेसाठी वाहनचालकांच्या वर्तनात सुधारणा होणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रस्तावित प्रणालीमध्ये प्रत्येक वाहतूक नियमभंगासाठी चालकाच्या खात्यावर पेनल्टी पॉईंट्स जमा केले जातील. ठरावीक मर्यादेपेक्षा अधिक पॉईंट्स जमा झाल्यास संबंधित चालकाचा परवाना निलंबित किंवा रद्द केला जाऊ शकतो. याउलट, वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या आणि चांगला ड्रायव्हिंग रेकॉर्ड असलेल्या चालकांना विमा कंपन्यांकडून सवलती तसेच विविध प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्यास अधिक प्राधान्य द्यावे, असा उद्देश या प्रणालीमागे असल्याचे सांगण्यात आले.

बीएस-4 वाहनांसाठी प्रदूषण नियंत्रणाचे नवे उपकरण

दरम्यान, जुन्या बीएस-4 वाहनांमधून होणारे घातक उत्सर्जन कमी करण्यासाठीही सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहे. गडकरी यांनी सुमारे 4,000 ते 5,000 रुपये किमतीचे ‘एमिशन-कंट्रोल डिव्हाइस’ विकसित करण्यात आल्याची माहिती दिली. या (Traffic Rules) उपकरणाच्या चाचण्या यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. हे उपकरण जुन्या बीएस-4 वाहनांमध्ये बसवल्यानंतर त्यातून होणारे उत्सर्जन बीएस-6 वाहनांच्या पातळीपर्यंत कमी करता येईल, असा दावा गडकरी यांनी केला. रस्ते सुरक्षा आणि वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून नियम अधिक कठोर करण्याच्या दिशेने पावले उचलली जात असल्याचे या घोषणांमधून स्पष्ट होते.