गंगा हिलसा मासा

नामशेष झालेला हिलसा माशाचे तब्बल तीन दशकांनंतर गंगेत पुनरागमन

Ganga hilsa fish: १९७५च्या फरक्का धरणानंतर गंगेत माशांची संख्या कमी झाल्याने, राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाने २०१९पासून पुनरुज्जीवन साठी चांगली कामगिरी केली.

नामशेष झालेला हिलसा माशाचे तब्बल तीन दशकांनंतर गंगेत पुनरागमन

Ganga hilsa fish

वाराणसी (Ganga hilsa fish) : गंगेच्या मध्य आणि वरच्या प्रवाहातून जवळपास नामशेष झालेला हिलसा मासा तब्बल तीन दशकांनंतर पुन्हा आढळल्याने नदीच्या पर्यावरणीय पुनरुज्जीवनाला मोठे यश मिळाले आहे. उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील मार्कंडेय महादेव मंदिराजवळ गंगेत ७४० ग्रॅम वजनाचे दोन हिलसा मासे आढळले.

ऐतिहासिकदृष्ट्या हिलसा मासे बंगालच्या उपसागरातून गंगा नदीतून वाराणसी, प्रयागराज आणि त्यापुढील भागात स्थलांतर करीत असत. मात्र, १९७५मध्ये फरक्का धरण उभारल्यानंतर त्यांच्या स्थलांतर मार्गात अडथळा निर्माण झाला. परिणामी मध्य आणि वरच्या गंगा खोऱ्यात हिलसाची संख्या झपाट्याने घटली. (Ganga hilsa fish) हिलसाचे पर्यावरणीय, पोषणमूल्य, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व लक्षात घेऊन भारतीय कृषी संशोधन परिषद-अंतर्देशीय मत्स्य संशोधन संस्था (आयसीएआर-सीआयएफआरआय), बॅरकपूर आणि राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाने २०१९पासून पुनरुज्जीवन कार्यक्रम राबवला.

जून २०२६पर्यंतच्या या मोहिमेत ३.८५ लाखांहून अधिक लहान व प्रौढ हिलसांचे संगोपन करण्यात आले. तसेच ४० लाखांहून अधिक फलित अंडी आणि सुमारे ९.४ लाख हॅचरीमध्ये तयार केलेली अंडी फरक्का बंधाऱ्याच्या वरच्या भागात सोडण्यात आली. (Ganga hilsa fish) टॅगिंग व नियमित निरीक्षणातून माशांच्या स्थलांतराची माहिती मिळवण्यात आली. २०२३ ते २०२५दरम्यान पाळीव हिलसाची मिर्झापूरपर्यंतची प्रवाहाविरुद्ध हालचाल नोंदवण्यात आली होती. आता चंदौलीजवळ हिलसा आढळल्याने त्याचा ऐतिहासिक अधिवास पुनर्स्थापित होत असल्याचे संकेत मिळाले आहेत.

संबंधित सामग्री

उत्तर प्रदेशात पावसाचा कहर; 56 जणांचा मृत्यू, 46 जखमी, 1,020 हून अधिक घरांचे नुकसान

उत्तर प्रदेशात पावसाचा कहर; 56 जणांचा मृत्यू, 46 जखमी, 1,020 हून अधिक घरांचे नुकसान

उत्तर प्रदेशात अतिवृष्टीमुळे 56 मृत्यू, 1,020 घरांचे नुकसान; ओडिशात महानदीला पूराचा धोका, ऋषिकेश राफ्टिंग बंद.

Sep 28, 2026
रात्रीच्या अंधारात ड्रोनच्या घिरट्या; रेकी, चोरी की घातपात? बार्शीटाकळी तालुक्यात नागरिकांमध्ये भीती

रात्रीच्या अंधारात ड्रोनच्या घिरट्या; रेकी, चोरी की घातपात? बार्शीटाकळी तालुक्यात नागरिकांमध्ये भीती

बार्शीटाकळी तालुक्यात रात्री विविध गावांमध्ये ड्रोनच्या घिरट्या; चोरीच्या रेकीची चर्चा. पोलिसांनी पाहणी केली असून ड्रोनच्या उद्देशाची चौकशी सुरू आहे.

Sep 20, 2026
वाशिम जिल्ह्यातील ११ बॅरेजचे दरवाजे १५ सप्टेंबरपासून बंद होणार

वाशिम जिल्ह्यातील ११ बॅरेजचे दरवाजे १५ सप्टेंबरपासून बंद होणार

Penganga River Water Storage: वाशिम जिल्ह्यातील पेनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या सर्व ११ बॅरेजचे उघडे असलेले दरवाजे येत्या १५ सप्टेंबरपासून बंद करून पाणी अडवण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला

Sep 01, 2026
कानपूरमध्ये ट्रेनिंग विमान कोसळलं; उड्डाणानंतर अचानक स्फोट, एक पायलट ठार तर दुसरा गंभीर जखमी

कानपूरमध्ये ट्रेनिंग विमान कोसळलं; उड्डाणानंतर अचानक स्फोट, एक पायलट ठार तर दुसरा गंभीर जखमी

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गुरुवारी दुपारी प्रशिक्षणासाठी उड्डाण केलेल्या विमानाला भीषण अपघात झाला.

Aug 27, 2026
रक्षाबंधनाला माहेरी जाताना पैनगंगा नदीत महिलेचा बुडून मृत्यू

रक्षाबंधनाला माहेरी जाताना पैनगंगा नदीत महिलेचा बुडून मृत्यू

मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवरील पैनगंगा नदीपात्रात संगमेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला एका ४४ वर्षीय महिलेचा मृतदेह तरंगताना आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Aug 26, 2026