पालकमंत्री मेघना बोर्डीकर

परभणीत दुष्काळ पाहण्यासाठी पालकमंत्री पोहचल्या कुंडीच्या बांधावर

Minister Meghna Bordikar: मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार २४ सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सेलू तालुका

परभणीत दुष्काळ पाहण्यासाठी पालकमंत्री पोहचल्या कुंडीच्या बांधावर

Minister Meghna Bordikar

 

पिकांची प्रत्यक्ष पाहणी; शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेत दिला धीर

सेलू (Minister Meghna Bordikar) : मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार २४ सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सेलू तालुक्यातील कुंडी शिवारात जाऊन दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांची पाहणी केली.

यावेळी त्यांनी शेतकर्‍यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि पिकांच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. पावसाअभावी पिकांवर आलेले संकट, उत्पादनातील संभाव्य घट तसेच शेतकर्‍यांच्या आर्थिक अडचणी याबाबत त्यांनी शेतकर्‍यांकडून माहिती घेतली. शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केल्याने प्रशासनाला नुकसानीचे वास्तव समजण्यास मदत होणार असून, शासनाकडून मिळणार्‍या मदतीकडे आता शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. सेलू तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी तातडीची मदत, पीक नुकसानीचे मूल्यांकन आणि शासन निर्णयाची प्रतीक्षा, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. यावेळी डॉ . संजय रोडगे, गणेश काटकर, शामराव मोगल, आरुणराव मोगल, जीवन मोगली, डॉ. आशिष डख या परीसरातील शेतकरी यांची उपस्थिती होती.

सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी
‘कोणीही विचलित होऊ नये. सरकार ठामपणे शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे आहे. शेतकर्‍यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून शासनस्तरावर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. सरकार लवकरात लवकर शेतकर्‍यांसाठी मदत घोषित करेल,’ असा विश्वास (Minister Meghna Bordikar) पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

संबंधित सामग्री

परभणीत रविवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचे ना. मेघना बोर्डीकर यांचे आवाहन

परभणीत रविवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचे ना. मेघना बोर्डीकर यांचे आवाहन

Minister Meghna Bordikar: देशासमोरील युद्धजन्य परिस्थिती, इंधन बचतीची गरज आणि पर्यावरण संवर्धन लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सप्तसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे.

May 15, 2026