राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात महाराष्ट्राचा `चौकार`

National Teachers' Award: शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देशभरातील ४८ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात महाराष्ट्राचा `चौकार`

National Teachers' Award

 

शिक्षकदिनी विज्ञान भवनात होणार गौरव

नवी दिल्ली/ मुंबई (National Teachers' Award) : शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देशभरातील ४८ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-२०२६ साठी निवड करण्यात आली असून, त्यात महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश आहे. बीडच्या डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे, नाशिकच्या कुंदा जयवंत बच्छाव, लातूरचे वैभव वसंतराव कुलकर्णी आणि साताऱ्याचे शिवप्रसाद अरविंद टिंगरे हे महाराष्ट्राचे चार मानकरी आहेत. शिक्षकदिनी ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

बीड जिल्ह्यातील केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या डॉ. कविता गिट्टे यांनी दिव्यांग, ऊसतोड कामगारांची मुले आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष काम केले. (National Teachers' Award) आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर करण्यासह विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळती रोखण्यासाठी त्यांनी विविध प्रयोग राबविले. नाशिक महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक १८, आनंदवली येथील कुंदा बच्छाव यांनी ‘मिशन मोबाईल-फ्री’, ‘ज्ञानभिंती’, ‘आनंदवली शिक्षण कट्टा’ यांसारखे अभिनव उपक्रम राबविले. अमेरिकेतील शाळांशी ‘ई-ट्विनिंग’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील संवादाची संधीही त्यांनी उपलब्ध करून दिली.

लातूरच्या पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयातील वैभव वसंतराव कुलकर्णी यांनी गणितातील अवघड संकल्पना सोप्या करण्यासाठी नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि कमी खर्चाची शैक्षणिक साधने विकसित केली. त्यांना तीन दशकांहून अधिक अध्यापनाचा अनुभव आहे. साताऱ्याच्या सैनिक स्कूलमधील शिवप्रसाद अरविंद टिंगरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि देशसेवेची भावना रुजविण्यासाठी योगदान दिले. एनडीएसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी केले आहे.

संबंधित सामग्री

लातूरच्या वैभव कुलकर्णी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

लातूरच्या वैभव कुलकर्णी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील ४८ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी निवड करण्यात आली आहे.

Aug 22, 2026