झारखंड विद्यार्थी आंदोलन

झारखंडमध्ये आंदोलक विद्याथ्यावर पोलिसांकडून लाठीमार; अश्रुधूर आणि पाण्याचा मारा, काही आंदोलक जखमी

Jharkhand Paper Leak Case: झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील कथित गैरप्रकारांविरोधात सोमवारी हजारो विद्यार्थी आणि नोकरीच्या इच्छुकांनी राजधानी रांचीमध्ये जोरदार आंदोलन केले. विविध मागण्या घेऊन आंदोलक..

झारखंडमध्ये आंदोलक विद्याथ्यावर पोलिसांकडून लाठीमार; अश्रुधूर आणि पाण्याचा मारा, काही आंदोलक जखमी

Jharkhand Paper Leak Case

भरती परीक्षेतील गैरप्रकारावरून झारखंडमध्ये संताप

रांची () : झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील कथित गैरप्रकारांविरोधात आज सोमवारी हजारो विद्यार्थी आणि नोकरीच्या इच्छुकांनी राजधानी रांचीमध्ये जोरदार आंदोलन केले. विविध मागण्या घेऊन आंदोलकांनी राज्य विधानसभेकडे मोर्चा काढला. (Jharkhand Paper Leak Case) आंदोलकांनी बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी पाण्याचा मारा, अश्रुधुराच्या नळकांड्या आणि लाठीमार केला. या कारवाईत काही आंदोलक जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

परीक्षांतील पारदर्शकतेची मागणी

भरती प्रक्रियेत कथित अनियमितता, परीक्षा गैरप्रकार आणि सरकारी नोकऱ्यांमधील पारदर्शकतेच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने रांचीतील वातावरण तणावपूर्ण झाले. पोलिसांनी अनेक स्तरांवर बॅरिकेडिंग करून आंदोलकांना विधानसभेच्या दिशेने जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, (Jharkhand Paper Leak Case) आंदोलकांनी बॅरिकेड्स हटवून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर परिस्थिती चिघळली. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांसह अश्रुधुराचा वापर केला आणि लाठीमार केला.

दरम्यान, झारखंड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष एल. खियांगते यांना अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परीक्षा गैरप्रकाराच्या मुद्द्यावर सरकारवर दबाव आणखी वाढला आहे. आंदोलनामुळे झारखंडमधील युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नाने पुन्हा एकदा राजकीय रंग घेतला आहे.

जेपीएससीच्या वादग्रस्त चेअरमनला अटक

जेपीएससीचे माजी अध्यक्ष एल खियांगते यांना परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ब्लॅकलिस्टेड एजन्सीला काम दिल्याचा आणि ओएमआर शीटमध्ये छेडछाड केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या (Jharkhand Paper Leak Case) अटकेमुळे रांचीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घोटाळ्याविरोधातील आंदोलनाला बळ मिळाले आहे. सीआयडी तपासानंतर ही मोठी कारवाई झाली असून, अनेक बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग उघड होण्याची शक्यता आहे.