नीट पेपरफुटी आंदोलन

नीट पेपरफुटी आणि सोनम वांगचुक प्रकरणावर लातूरकरांचा एल्गार!

NEET Paper Leak Protest: लातूर येथील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नीतपत्रांमुळे झालेल्या सतर्कतेसाठी आंदोलन केले. सरकारला लोकशाही मार्गावर प्रतिक्रिया देण्याची मागणी करून आंदोलक

नीट पेपरफुटी आणि सोनम वांगचुक प्रकरणावर लातूरकरांचा एल्गार!

NEET Paper Leak Protest

 

केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी!

लातूर (NEET Paper Leak Protest) : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणादरम्यान प्रशासनाने कथित बळाचा वापर केल्याच्या निषेधार्थ सोमवारी लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात धरणे आंदोलनात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. देशाचे शिक्षण मंत्री राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत सातत्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

आंदोलनकर्त्यांनी नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अशा गंभीर प्रकरणात कोणतीही दिरंगाई न करता पारदर्शक तपास व्हावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. याचबरोबर, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर बळाचा वापर होऊ नये, तसेच नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर राखला जावा, अशीही मागणी आंदोलकांनी केली. देशातील शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, न्याय आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची आवश्यकता उपस्थितांनी अधोरेखित केली.

या (NEET Paper Leak Protest) आंदोलनात तरुणाईचा सहभाग हा लक्षवेधी ठरला लातूर शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दिला या धरणे आंदोलनात जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत सातत्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. महात्मा गांधी चौकात झालेल्या या आंदोलनादरम्यान परिसर घोषणांनी दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा आणि लोकशाही पद्धतीने मांडल्या जाणाऱ्या मागण्यांची दखल घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. 
या आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

विद्यार्थ्यांसह आंदोलनात मान्यवरांचा सहभाग

या आंदोलनात प्रामुख्याने अँड. उदय गवारे, प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील, मोहसीन खान, रमेश बिरादार, डॉ. बी. आर. पाटील, प्रा. अर्जुन जाधव, प्रा. दत्ता सोमवंशी, माधव बावगे, विश्वंभर भोसले, अँड. संभाजीराव पाटील, संजय मोरे, धर्मराज पाटील, प्राचार्य प्रशांत घार, राजा मणियार, रामकुमार रायवाडीकर, बी. बी. गायकवाड, राजकुमार होळकर, अँड. सुशील सोमवंशी, सोहम कवठेकर, नगरसेवक सचिन गायकवाड, तब्बसुम शेख, अँड प्रवीण पाटील, सुपर्ण जगताप, रंजना हसुरे, रुकसाना मुल्ला, रमेश चिल्ले, अँड. विजय जाधव, अँड. गोविंद शिरसाट, शफी शेख, रामराव गवळी, डी. उमाकांत, उमेश कांबळे, प्रताप भोसले, डॉ. उमाकांत गोदाम, सुभाष  जाधव, डॉ. दीपा जगताप, गणेश कांबळे, उत्तरेश्वर  बिराजदार, विष्णू सुर्यवंशी, पांडुरंग देडे, अँड. सुनील गायकवाड यांच्यासह अनेक जण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित सामग्री

कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे

कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे

Kurunda Farmers' Protest: भारतीय स्टेट बँक  शाखेच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, सातत्याने होणाऱ्या पिळवणूक व हेळसांडीला कंटाळून ७ ऑक्टोबर बुधवार रोजी संतप्त शेतकऱ्यांनी बँकेच्या शाखा.

Oct 07, 2026
राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026