आ. श्वेता महाले

'सर्पदंशाने एकही जीव जाऊ नये', सर्पदंश प्रतिबंधासाठी स्वतंत्र धोरणाची आ. श्वेता महाले यांची मागणी.. 

MLA Shweta Mahale: गावातील कुटुंबांना उपचार मिळत नसल्यामुळे सर्पदंशाचे घटक वाढले असून, आमदार श्वेता महाले पाटील यांनी गावानुरूप उपचार साठांची मागणी घेतली आहे.

'सर्पदंशाने एकही जीव जाऊ नये', सर्पदंश प्रतिबंधासाठी स्वतंत्र धोरणाची आ. श्वेता महाले यांची मागणी.. 

MLA Shweta Mahale

ग्रामीण जनतेसाठी आमदार श्वेता महाले पाटील यांची विधानसभेत लक्षवेधीद्वारे आर्त हाक...

चिखली (MLA Shweta Mahale) : ग्रामीण भागातील अशाच हजारो कुटुंबांच्या वेदनेला आवाज देत चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आ. श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale) यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सर्पदंशाच्या गंभीर प्रश्नावर लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले.पावसाळा सुरू झाला की शेतात राबणाऱ्या शेतकरी, शेतमजूर, आदिवासी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनात सर्पदंशाची भीती निर्माण होते. अनेकदा वेळेत उपचार न मिळाल्याने एखाद्या कुटुंबाचा कर्ता पुरुष, आई किंवा तरुण मुलगा मृत्यूमुखी पडतो आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. 

"उपचाराअभावी एकही जीव जाऊ नये," अशी भावनिक भूमिका मांडत आ. श्वेता महाले पाटील यांनी सर्पदंश प्रतिबंध व उपचारासाठी राज्याचे स्वतंत्र धोरण जाहीर करण्याची तसेच राज्यातील प्रत्येक शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटी-स्नेक व्हेनमचा पुरेसा आणि कायमस्वरूपी साठा उपलब्ध करून देण्याची ठाम मागणी सभागृहात केली.

पावसाळ्यात शेतात काम करताना सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून, दुर्गम आणि ग्रामीण भागात वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे वास्तव त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. सर्पदंशाचा प्रश्न हा केवळ आरोग्याचा विषय नसून ग्रामीण कुटुंबांच्या जीवन-मरणाशी निगडित मानवी प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावर उत्तर देताना राज्याचे आरोग्यमंत्री यांनी राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रतिविष उपलब्ध असल्याची माहिती दिली. राज्यात सध्या १ लाख ९४ हजार ९१४ अँटी-स्नेक व्हेनमच्या वायल्स उपलब्ध असून, आवश्यक त्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये त्यांचा साठा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणामध्ये कोणतीही उणीव राहू दिली जाणार नसून आवश्यक ते प्रशिक्षण अधिक प्रभावीपणे राबविण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. याशिवाय, सर्पदंश झाल्यानंतर संबंधित साप विषारी आहे की बिनविषारी हे अवघ्या पाच मिनिटांत ओळखता यावे यासाठी 'अँटी स्नेक व्हेनम किट' राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली.

ग्रामीण भागातील एखाद्या कुटुंबाचा आधारवड केवळ उपचाराअभावी हिरावला जाऊ नये, प्रत्येक नागरिकाला वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत आणि सर्पदंशामुळे होणारी जीवितहानी थांबावी, यासाठी आपला पाठपुरावा सातत्याने सुरू राहील, अशी भावना आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale) यांनी यावेळी व्यक्त केली. ग्रामीण जनतेच्या आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न थेट विधानसभेत मांडत जीवनरक्षणाच्या या विषयाला प्राधान्य देणाऱ्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या भूमिकेचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.

संबंधित सामग्री

अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल कधी? फडणवीसांनी विधानसभेत दिली मोठी माहिती

अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल कधी? फडणवीसांनी विधानसभेत दिली मोठी माहिती

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या विमान अपघाताच्या तपासाचा अंतिम अहवाल पुढील वर्षी जानेवारीपर्यंत समोर येण्याची शक्यता आहे.

Jul 11, 2026
'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर

'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्ष निशाणा साधला.

Jul 10, 2026
विधानसभेत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; 2026-27 पीक कर्ज परतफेडीची अट रद्द

विधानसभेत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; 2026-27 पीक कर्ज परतफेडीची अट रद्द

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेत मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे.

Jul 10, 2026
“…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर

“…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील महत्त्वाकांक्षी 'मिसिंग लिंक' (Missing Link) प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्याच्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

Jul 10, 2026