अमरावती (Amravati Wildlife Protector) : वनविभाग व नागरिकांमध्ये दुवा म्हणून वन्यजीव संवर्धन कायदा १९७२ नुसार प्रत्येक जिल्ह्यात मानद वन्यजीव रक्षक हे पद राज्य शासनाच्या वनविभागाच्या मार्फत प्रमाणित करण्यात येते. अमरावती जिल्ह्याच्या मानद वन्यजीव रक्षकांच्या (Amravati Wildlife Protector) पदावर नुकतेच अमरावती येथील सौरभ जवंजाळ व परतवाडा येथील अल्केश ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सौरभ जवंजाळ - वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था (वेक्स) या संस्थेचे कार्यकारी सदस्य असुन ते गेल्या १५ वर्षांपासून पक्षी निरीक्षण व वन्यजीव अभ्यासक म्हणून कार्यरत असुन ते महाराष्ट्र पक्षिमित्र चे सक्रिय सभासद आहेत.
अल्केश ठाकरे - हे दहा वर्षे पेक्षा अधिक काळापासून वन्यजीव क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या या नियुक्ती बाबत वेक्स चे डॉ जयंत वडतकर, ॲड. राजमेहेर निशाणे, प्रा.डॉ.अनंत वडतकर, डॉ. अनिरुद्ध देशमुख, प्रा.डॉ गजानन वाघ, अमेय ठाकरे यांनी अभिनंदन केले.