आमदार मनोज कायंदे

जालना-पुलगाव राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला गती द्या; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे MLA मनोज कायंदे यांची मागणी

MLA Manoj Kayande: सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि प्रलंबित विकासकामांना गती मिळण्यासाठी मा. नितीनजी गडकरी साहेब यांची आमदार मनोज कायंदे सदिच्छा भेट

जालना-पुलगाव राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला गती द्या; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे MLA मनोज कायंदे यांची मागणी

MLA Manoj Kayande

सिंदखेड राजा मतदारसंघातील विविध रस्ते व पुलांच्या कामांसाठी भरीव निधी देण्याची गडकरींची ग्वाही

सिंदखेड राजा (MLA Manoj Kayande) : सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि प्रलंबित विकासकामांना गती मिळण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी साहेब यांची आमदार मनोज कायंदे (MLA Manoj Kayande) नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या भेटीदरम्यान प्रामुख्याने जालना–पुलगाव राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला तातडीने गती देण्यात यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. यासोबतच सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचे ग्रामीण व शहरी रस्ते, पूल आणि पुलांच्या रुंदीकरणाच्या नवीन विकासकामांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

मातृतीर्थ सिंदखेड राजा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने रस्ते कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची असून, पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांनी सिंदखेड राजा मतदारसंघातील सर्व प्रलंबित व नवीन विकासकामांबाबत अत्यंत सकारात्मक भूमिका दर्शवली. तसेच आवश्यक असणारा भरीव निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देऊन पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी दिली.

या पुढाकारामुळे मतदारसंघातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी असाच पाठपुरावा यापुढेही अविरतपणे सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

संबंधित सामग्री

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026