माहुर विधानसभा मतदारसंघ

खा. शिंदे यांच्या दौऱ्यावरून आष्टीकर, खराटे यांच्यात राजकीय ठिंणगी 

Mahur Assembly Constituency: दोन्ही शिवसेनांमधील पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना खा. डॉ. श्रीकांत शिंदे या दौऱ्यादरम्यान ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका

खा. शिंदे यांच्या दौऱ्यावरून आष्टीकर, खराटे यांच्यात राजकीय ठिंणगी 

Mahur Assembly Constituency

 

हिम्मत असेल तर अडवून दाखवा: खा.आष्टीकर

वाय प्लस सुरक्षा बाजूला ठेवा मग दौरा करा: जिल्हा प्रमुख खराटे

माहुर (Mahur Assembly Constituency) : दि. १ जुलै रोजी शिंदे शिवसेनेचे नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे किनवट–माहुर विधानसभा मतदारसंघातील सारखणी येथे आयोजित कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्या समवेत नुकतेच उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला सोडचिठ्ठी देऊन शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेले हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे देखील उपस्थित होते.

दोन्ही शिवसेनांमधील पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना खा. डॉ. श्रीकांत शिंदे या दौऱ्यादरम्यान ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतीबा खराटे यांच्या नेतृत्वात डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच काळे झेंडे दाखवत निषेध नोंदविण्यात आला.

या (Mahur Assembly Constituency) घटनेनंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी थेट प्रतिक्रिया देत विरोधकांना खुले आव्हान दिले. “कोण किती पाण्यात आहे हे मला चांगले माहिती आहे. आम्ही विकासाच्या मुद्यावर पक्षप्रवेश केला आहे अशी विरोधाकांची कानटोचणी केली तर  येत्या दहा ते बारा दिवसांत किनवट–माहुर मतदारसंघाचा दौरा करून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढणार आहोत. हिंमत असेल तर त्यावेळी अडवून दाखवा असा इशारा विरोधकांना त्यांनी दिला.खा.आष्टीकर यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देताना ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतीबा खराटे यांनीही आक्रमक भूमिका घेत आमचे पोलिसांशी वैर नाही प्रथम तुमची वाय प्लस सुरक्षा बाजूला करा आणि मग किनवट–माहुर मतदारसंघात दौरा करा,” असे थेट प्रत्युत्तर देत त्यांनी देत आव्हान स्वीकारल्याचे स्पष्ट केले.

या शाब्दिक संघर्षामुळे किनवट माहुर मतदारसंघात राजकीय वातावरण आणखी तापले असून आगामी काळात होणाऱ्या दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांतील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला अडवून काळे झेंडे दाखवणार्‍या शिवसेनाकांच्या पाठीवर थाप देण्यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट खराटे यांना फोन करून तुमच्या सारखी निष्ठावंत शिवसैनिक असल्याने शिवसेनेस धोका नाही अशा शब्दात शिवसैनिकांचे मनोबल वाढवित पुढचा दौरा हा किनवट विधानसभेत राहिल असे हि ते पदाधिकाऱ्यांना सांगितले. 

संबंधित सामग्री

'गद्दारीला माफी नाही', हिंगोलीत पाऊल ठेवल्यास खासदार आष्टीकरांचे तोंड काळे करू

'गद्दारीला माफी नाही', हिंगोलीत पाऊल ठेवल्यास खासदार आष्टीकरांचे तोंड काळे करू

ShivSena Parmeshwar Mandge: उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, खासदार नागेश पाटील आष्टीकराला गद्दारीची आरोप करत शिवसेनेच्या विरोधात इशारा देऊन हिंगोलीत गाजावाजा सुरू

Jun 23, 2026
वाढीव मालमत्ता कराविरोधात शिवसेनेचा हल्लाबोल!

वाढीव मालमत्ता कराविरोधात शिवसेनेचा हल्लाबोल!

Increased property taxes: शिवसेने चिखलीच्या शहरप्रमुखाने शुक्रवारी कर वाढीवर विरोध करून नगर परिषदेचे आकारणी निवेदन दिले. महागाई, बेरोजगारीमुळे आर्थिक दबावात असलेल्या नागरिकांचा तत्काळ पुनरुचार मागितला

Jun 19, 2026