आ. अभिमन्यू पवार

लातूर जिल्ह्यात पावसाचा खंड, तातडीने पीक पाहणी करा: आ. अभिमन्यू पवार

MLA Abhimanyu Pawar: कृषी विद्यापीठातील संबंधित विषयातील तज्ज्ञ, हवामानशास्त्रज्ञ तसेच महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक नियुक्त करून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तातडीने पाहणी...

लातूर जिल्ह्यात पावसाचा खंड, तातडीने पीक पाहणी करा: आ. अभिमन्यू पवार

MLA Abhimanyu Pawar

औसा (MLA Abhimanyu Pawar) : खरीप हंगाम २०२६ मध्ये लातूर जिल्ह्यात अपुरे पर्जन्यमान तसेच पावसाचे दीर्घ खंड यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्याच्या ताणामुळे पिके वाळण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच विविध रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यातील सुमारे ५० ते ६० टक्के क्षेत्रावरील खरीप पिके धोक्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठातील संबंधित विषयातील तज्ज्ञ, हवामानशास्त्रज्ञ तसेच महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक नियुक्त करून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तातडीने प्रत्यक्ष पीक पाहणी करण्यात यावी, अशी मागणी (MLA Abhimanyu Pawar) आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

आ.अभिमन्यू पवार (MLA Abhimanyu Pawar) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पीक नुकसानीचे अचूक व शास्त्रीय मूल्यांकन करण्यासाठी केवळ प्रशासकीय पाहणी न करता कृषी विद्यापीठातील संबंधित विषयातील तज्ज्ञ व शास्त्रज्ञ, हवामानशास्त्रज्ञ, महसूल विभाग आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या पथकामार्फत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष शेतांवर जाऊन पाहणी करावी. तसेच तालुकानिहाय आणि मंडळनिहाय पिकांची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण व पावसातील खंड, पिकांवरील पाण्याचा ताण, रोग-किडींचा प्रादुर्भाव, बाधित क्षेत्राचे प्रमाण आणि संभाव्य उत्पादनातील घट यांचा शास्त्रीय पद्धतीने आढावा घ्यावा, अशी मागणी आ. पवार (MLA Abhimanyu Pawar) यांनी केली आहे.

टैग्स: MLA Abhimanyu Pawar

संबंधित सामग्री

आमदार अभिमन्यू पवारांसह गुळ पावडर उद्योजकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट

आमदार अभिमन्यू पवारांसह गुळ पावडर उद्योजकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट

गुळ पावडर उद्योगाच्या अडचणी तसेच प्रस्तावित नवीन गुळ नियंत्रण कायद्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Aug 25, 2026