आमदार रोहित पवार

शेतकऱ्याला 50 हजार द्या, नाहीतर रस्त्यावर फिरू देणार नाही

MLA Rohit Pawar: जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती आणि एका शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी २१ सप्टेंबरला हिंगोली जिल्ह्यातील शेतांची पाहणी केली...

शेतकऱ्याला 50 हजार द्या, नाहीतर रस्त्यावर फिरू देणार नाही

MLA Rohit Pawar

 

हिंगोलीतील दुष्काळी पाहणी दौऱ्यावर आमदार रोहित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल

हिंगोली (MLA Rohit Pawar) : जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती आणि एका शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी २१ सप्टेंबरला हिंगोली जिल्ह्यातील शेतांची पाहणी केली. वैद्य नावाच्या शेतकऱ्याच्या पाच एकर शेतातील पीक पूर्णपणे जळून खाक झाल्याने त्यांचे सुमारे एक लाख वीस हजार रुपयांचे नुकसान झाले असून, या आर्थिक विवंचनेतूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी सांगितले की, हिंगोली जिल्ह्यात दरवर्षी चार लाख हेक्टरवर पेरणी होते, मात्र यंदा ती केवळ साडेतीन लाख हेक्टरवरच झाली आहे. त्यापैकी अडीच लाख हेक्टरवर सोयाबीन आहे, पण दुष्काळामुळे सोयाबीनसह कापूस, हळद यांसारखी सर्वच पिके हातातून गेली आहेत. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करूनही पदरात काहीच पडलेले नाही.

शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन करताना रोहित पवार (MLA Rohit Pawar) म्हणाले की, सरकार चुकत असेल तर त्याची शिक्षा स्वतःला आणि कुटुंबाला देऊ नका. सरकारला गुडघ्यावर आणून आपल्या मागण्या मान्य करून घेऊ. त्यांनी सरकारकडे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि शेतात काम नसलेल्या शेतमजुरांना वीस ते पंचवीस हजार रुपयांची थेट मदत देण्याची मागणी केली.

राज्यातील ९५ टक्के शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचित असल्याचा आरोप त्यांनी केला. बँका जुने कर्ज असल्याने नवे कर्ज देत नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने सावकाराकडे जावे लागते, जिथे महिन्याला दहा टक्के म्हणजेच वर्षाला शंभर वीस टक्के व्याज आकारले जाते, असे ते म्हणाले. सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून पंचनामे करावेत आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात किंवा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, शेतकऱ्यांकडे किराणा घेण्यासाठी पैसे नसताना मंत्री दौऱ्यावर काजू-बदाम खात फिरत असल्याची टीका त्यांनी केली. सरकारने केवळ फोटो काढण्यासाठी दौरे न करता ठोस निर्णय घ्यावेत. जर हेक्टरी पन्नास हजारांची मदत दिली तर शेतकरीच तुमचा सत्कार करतील, पण केवळ आठ-दहा हजारांची मदत देऊन बोळवण करणार असाल तर शेतकरी तुम्हाला रस्त्यावरही फिरू देणार नाही, असा इशारा रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी यावेळी दिला.

टैग्स: MLA Rohit Pawar

संबंधित सामग्री

हे सरकार, गेंड्याच्या कातडीचे सरकार!

हे सरकार, गेंड्याच्या कातडीचे सरकार!

MLA Rohit Pawar: लातूर जिल्हा तसेच संपूर्ण मराठवाड्यात पावसाअभावी पिके करपून गेली आहेत. जेथे काही हिरवेगार पिके दिसतात, तेथे सोयाबीनला शेंगा नाहीत. एकंदर शेतकऱ्याच्या हातातून हा हंगाम गेला असून..

Sep 20, 2026