आमदार श्वेता महाले यांच्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांकडून तातडीने दखल; मदत व पुनर्वसन विभागाला कार्यवाहीच्या सूचना
चिखली (MLA Shweta Mahale) : बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली होती. या निवेदनाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने दखल घेत मदत व पुनर्वसन विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आमदार श्वेता महाले (MLA Shweta Mahale) यांनी २८ सप्टेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून बुलढाणा जिल्ह्यातील गोशाळांमधील गोवंशासाठी चारा, पाणी, विशेष आर्थिक मदत तसेच शासकीय चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली होती. निवेदनावर मुख्यमंत्री सचिवालयाकडून १ ऑक्टोबर २०२६ रोजी मदत व पुनर्वसन विभागाकडे तातडीच्या कार्यवाहीसाठी निर्देश देण्यात आल्याचे नमूद आहे.
पावसाच्या कमतरतेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतीबरोबरच पशुधनावरही मोठा परिणाम झाला आहे. हिरवा व कोरडा चारा तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने गोशाळा व पशुपालकांसमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने विशेष उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे आमदार महाले यांनी निवेदनातून निदर्शनास आणून दिले.
दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये शासकीय चारा छावण्या व चारा डेपो तातडीने सुरू करावेत.पात्र व नोंदणीकृत गोशाळांना विशेष दुष्काळी अनुदान व चारा निधी उपलब्ध करून द्यावा.पाणीटंचाई असलेल्या गोशाळांना टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करावा. फिरती पशुवैद्यकीय पथके नियुक्त करून मोफत तपासणी, औषधोपचार व लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.जिल्ह्याबाहेरून चारा आणण्यासाठी वाहतूक अनुदान व आवश्यक प्रशासकीय सवलती द्याव्यात.दुष्काळी परिस्थितीतील तातडीच्या गरजांसाठी विशेष आर्थिक पॅकेज अथवा आपत्कालीन निधी उपलब्ध करून द्यावा. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पशुसंवर्धन विभाग व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीचा कृती आराखडा निश्चित करावा. इत्यादी मागण्या या निवेदनाद्वारे आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale) यांनी केल्या आहेत.
आमदार श्वेता महाले (MLA Shweta Mahale) यांनी मांडलेल्या या मागण्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी तातडीने दखल घेत मदत व पुनर्वसन विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील गोशाळा व पशुधनाच्या चारा-पाण्याच्या प्रश्नावर शासनस्तरावर पुढील कार्यवाहीला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांसोबतच त्यांच्या पशुधनाचा चारा व पाण्याचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. पशुधन वाचविण्यासाठी शासनाने तातडीने आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale) यांनी केली आहे..