समृद्धी महामार्ग ट्रक

समृद्धी महामार्गावर ट्रक आडवा; मुंबई लेनवर वाहतुकीचा मोठा खोळंबा, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Samruddhi Mahamarg Traffic Jam: नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जाणारा एचआर ५५ बीए ८५४४ क्रमांकाचा ट्रक गणेशपूर शिवारातील चॅनेज क्रमांक ६१ जवळ चालकाने चक्क रस्त्याच्या मध्यभागी आडवा लावला.

समृद्धी महामार्गावर ट्रक आडवा; मुंबई लेनवर वाहतुकीचा मोठा खोळंबा, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Samruddhi Mahamarg Traffic Jam

वर्धा (Samruddhi Mahamarg Traffic Jam) : जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर रविवारी दुपारी धक्कादायक प्रकार घडला. नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जाणारा एचआर ५५ बीए ८५४४ क्रमांकाचा ट्रक गणेशपूर शिवारातील चॅनेज क्रमांक ६१ जवळ चालकाने चक्क रस्त्याच्या मध्यभागी आडवा लावला. ट्रक आडवा उभा करून चालक घटनास्थळावरून निघून गेल्याने मुंबई लेनवरील वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने प्रवाशांना तब्बल पाऊण ते एक तास मनस्ताप सहन करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपाजवळ एआरटीओच्या पथकाने या ट्रकची कागदपत्रे तपासली होती. (Samruddhi Mahamarg Traffic Jam) त्यात त्रुटी आढळल्याने चालकाला चालान देण्यात आल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि सावंगी मेघे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी इतरांच्या मदतीने ट्रक बाजूला करून मुंबई लेनवरील वाहतूक पूर्ववत केली. अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि सावंगी मेघेचे ठाणेदार विनोद गिरी यांनीही घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी सावंगी मेघे पोलीस पुढील चौकशी करीत आहेत.