महायुतीच्या भव्य दहीहंडीला ‘टाईमपास’ची प्राजू अर्थात केतकी माटेगावकर प्रमुख आकर्षण
चिखली (Chikhli Dahihandi Festival) : श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देणारी आणि गोविंदांच्या उत्साहाने दरवर्षी गाजणारी चिखलीची महायुतीची दहीहंडी यंदाही भव्य स्वरूपात रंगणार आहे. विदर्भातील सर्वात मोठी आणि नंबर वन दहीहंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, चिखली येथे करण्यात आले आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या स्वागताध्यक्षतेखाली होणाऱ्या या (Chikhli Dahihandi Festival) दहीहंडी सोहळ्यासाठी यंदा विशेष आकर्षण लाभले आहे. ‘टाईमपास’ चित्रपटातील लोकप्रिय प्राजू अर्थात अभिनेत्री केतकी माटेगावकर या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे दहीहंडीच्या उत्साहाला चार चाँद लागणार आहेत. सोबतच प्रसिद्ध अँकर भाविका, डीजे तेजस, रियाना, आशंका हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
त्याचबरोबर आणखीन एक सेलिब्रिटी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून त्या सेलिब्रिटीचे नाव उघड करण्यासंदर्भात बरीच गुप्तता पाळण्यात आली आहे त्यामुळे ती सेलिब्रिटी नेमकी कोण असणार ही उत्सुकता शिगेला पोचली आहे.
भगवान श्रीकृष्ण आणि गोप-गोपिकांच्या प्रेमळ नात्याची आठवण करून देणाऱ्या या उत्सवातून प्रेम, आनंद, बंधुभाव आणि एकजुटीचा संदेश देण्यात येणार आहे. दहीहंडीचा मानवी मनोरा जसा प्रत्येकाच्या विश्वासावर उभा राहतो, त्याचप्रमाणे चिखलीच्या विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहावे, असे भावनिक आवाहन आमदार श्वेता महाले पाटील यांनी केले आहे.
या भव्य सोहळ्याचे उद्घाटक केंद्रीय आयुष राज्यमंत्री तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाशजी फुंडकर राहणार आहेत. प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार चैनसुख संचेती माजी मंत्री आमदार संजय कुटे आमदार संजय गायकवाड आमदार मनोज कायंदे भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे चिखली नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख माजी आमदार तोताराम कायंदे माजी आमदार शशिकांत खेडेकर माजी आमदार दिलीपकुमार सानंदा माजी आमदार संजय रायमुलकर उपनगराध्यक्ष चिखली वैशालीताई खेडेकर जिल्हाध्यक्ष भाजपा सचिन देशमुख जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नाझेर काजी, जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा संतोष काळे पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत आदि महायुतीतील विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा विनीत असलेल्या या (Chikhli Dahihandi Festival) दहीहंडी उत्सवासाठी युवा कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. गोविंदांचे थरारक मानवी मनोरे, ढोल-ताशांचा आणी डी जे चा गजर आणि हजारो नागरिकांची उपस्थिती यामुळे चिखलीचा परिसर दुमदुमणार आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित या या विदर्भातील नंबर वन दहीहंडीचा (Chikhli Dahihandi Festival) हा जल्लोष प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी चिखलीकरांसह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कृष्णाच्या मुरलीचा सूर, गोविंदांचा थरार आणि ‘प्राजू’ केतकी माटेगावकर यांची विशेष उपस्थिती यामुळे चिखलीची महायुती दहीहंडी यंदा आणखी भव्य आणि अविस्मरणीय ठरणार आहे.