Washim :- तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य गोरगरीब उपेक्षित समाज घटकाच्या ज्वलंत समस्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शासनाला जागृत केल्या शिवाय उपाय नाही. म्हणून आज दि. १३ सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीच्यावतीने एकदिवसीय धरणे आंदोलन तहसिल कार्यालयावर छेडण्यात येणार आहे. तरी शेतकरी (Farmer) व सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँगेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ श्याम जाधव नाईक यांनी केले आहे.
राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकरी विविध समस्यांना तोंड देत
शेतकरी विरोधी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकरी विविध समस्यांना तोंड देत आहे. वाढती महागाई व नौकरी भरती यामुळे सर्वसामान्य जनता व सुशिक्षित बेरोजगार डबघाईत सापडले आहे. यावर्षी झालेली अतिवृष्टीमुळे शासनाने मानोरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करुन भरीव आर्थिक मदत द्यावी, पिक विम्याची अग्रीम २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून पिक कर्ज माफी द्यावी आदी मागण्यांसंदर्भात शासनाला जागे करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. तरी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतकांनी तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलनात सहभागी व्हावे , असे आवाहन मानोरा तालुका महाविकास आघाडीच्या वतीने रा.कॉ शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.श्याम जाधव (नाईक) यांनी केले आहे.




