४ कोटी ३२ लाख रुपयाचा केला भरणा
हिंगोली (Mahavitaran Abhay Yojana) : थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या मराठवाडयातील १५ हजार ६७२ ग्राहकांना महावितरणने अभय योजनेच्या (Mahavitaran Abhay Yojana) माध्यमातून वीज बिल थकबाकीतून मुक्ति आणि नवीन वीज जोडणीची सुवर्ण संधी दिली आहे. आता पर्यंत मराठवाडयातील एकूण १५,६७२ ग्राहकांनी ५०.९४ कोटी रूपयांचा भरणा करीत या योजनेत सहभाग नोंदवित उदंड प्रतिसाद दिला आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील ५९९ ग्राहकांनी ४ कोटी ३२ लाख रुपयाचा भरणा केला आहे.
या योजने अंतर्गत सर्व उच्च व लघुदाब थकबाकीदार ग्राहकांना (कृषि व सार्वजनिक पाणी पुरवठा योजना वगळून) ही एक संधी उपलब्ध झाली आहे. पूर्ण मुद्दल भरल्यास वीज बिलातील १०० टक्के व्याज आणि विलंब आकार माफ करण्यात येत आहे. (Mahavitaran Abhay Yojana) महावितरण अभय योजने मध्ये ३१ मार्च २०२५ पर्यंत सहभाग घेता येणार आहे. मार्च २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेले सर्व उच्चदाब व लघुदाब ग्राहक ( कृषि व सार्वजनिक पाणी पुरवठा योजना वगळून ) या (Mahavitaran Abhay Yojana) योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. ग्राहकांनी देय असलेल्या रक्कमेतून १०० टक्के विलंब आकार आणि व्याज माफ केले जात आहे. आणि १०० टक्के मुळ थकबाकी रक्कम भरल्यानंतर कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या तारखेपासून अर्जाच्या तारखेपर्यंत कोणतेही व्याज आकारले जात नाही.
ग्राहकांना थकबाकीची देय रक्कम १०० टक्के एक रक्कमी भरण्याचा किंवा किमान ३० टक्के डाउन पेमेंटसह जास्तीत जास्त सहा हप्त्यामध्ये भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. संबंधित वीज ग्राहकांना www. mahadiscom. in/wss/wss या वेबसाईटवरून ऑनलाईन पध्दतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाईल अॅप वरून योजनेचा लाभ घेता येईल. (Mahavitaran Abhay Yojana) वीज ग्राहक १९१२ किंवा १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती घेवू शकता.
योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज जोडणी घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज जोडणी घेण्याचीही सुविधा असेल. हिंगोली जिल्ह्यात ५९९ वीज ग्राहकांनी ४.३२ कोटी ३२ लाख रुपयाचा भरणा केला आहे.
उच्चदाब ग्राहकांनी मुळ थकबाकी एक रक्कमी भरल्यास त्यावर ५ टक्के अतिरिक्त सवलत तर लघुदाब ग्राहकांनी मुळ थकबाकी एक रक्कमी भरल्यास त्यावर १० टक्के अतिरिक्त सवलत मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेचा मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीज बिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. रक्क्म न भरल्यास कायदेशिर कारवाई होउ शकते. त्यामुळे ग्राहकांनी सवलतीचा लाभ घेवून चिंतामुक्त व्हावे. असे आवाहन (Mahavitaran Abhay Yojana) महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी केले आहे.