मानोरा (Manora Health Camp) : आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) आणि स्व. आशादेवी चव्हाण बहुउद्देशीय संस्था, पहूर (ई.) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ जुलै रोजी शहरातील माहेश्र्वरी भवन येथे आयोजित निशुल्क भव्य सर्व रोग निदान, उपचार आणि मोफत शस्त्रक्रिया (Health Camp) शिबीरात सुमारे २ हजार २६३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तर पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी ७२६ रुग्णांची नोंद करण्यात आली.
मानोरा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभाग घेतला. या शिबिरात मेडिसिन तज्ञ, रक्तदाब, अँजिओप्लास्टी, ब्लड शुगर, तसेच बरेच दिवसाचा ताप, हृदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे, आदी तपासणी (Health Camp) करण्यात आली. तसेच सर्जरी तज्ञ यांच्या माध्यमातून अंगावरील गाठी, स्तनातील गाठी, आतड्याचे आजार, पोटाचे आजार, बरेच दिवसापासून बरी न होणारी जखम, लगवी किंवा गुद्धारातून रक्त जाणे, पोटात वारंवार दुखणे, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने मासिक पाळीचे आजार, पांढरे पाणी जाणे, योनी मार्गामधून रक्तस्त्राव होणे, आदी तपासणी करून मार्गदर्शन केले.
मुखरोग तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घश्यात गिळतांना त्रास, तोंडात वारंवार होणारी जखम, पूर्णपणे तोंड न उघडणे, मुखदुर्गंधी इत्यादी रुग्णांचे निदान होणार आहे. नेत्ररोग तज्ञ डोळ्याचे सर्व आजार, मोतियाबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणा इत्यादी अस्थिरोग तज्ञ, संधीवात, मणक्यात असणारी गाठ, वाकलेले पाय, फ्रेंकचर, तसेच हाडांचे सर्व आजार, त्वचारोग तज्ञ डॉक्टर खाज, गजकरण, अंगावरील पांढरे डाग, डाग, त्वचेचे विविध आजार, तर बालरोग तज्ञ हृदयाला छिद्र असणे, मतिमंद मुलांच्या विकासासंबंधी आजार, तसेच कुपोषण, लहान मुलांचे सर्व आजार तपासणी झाली.
उपचार व शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आलेल्या ७२६ रुग्णांना पुढील (Free treatment) मोफत उपचारासाठी टप्प्याटप्प्याने मुंबई, नागपूर, सावंगी मेघे येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती शिबिराचे आयोजक अस्थिरोग तज्ञ डॉ महेश चव्हाण यांनी दिली.