माजी आ. पाटील यांची उपविभागीय अधिकारीकडे मागणी
मानोरा (Manora Heavy rain) : अतिवृष्टीमुळे शेती पिकासह अनेक घराघरात मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट बाधीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, असे मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी साहेब यांना राष्ट्रवादी काँगेस शरद पवार पक्षाचे नेते तथा माजी आ. अनंतकुमार पाटील यांनी दिले आहे.
कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघात दिनांक १ सप्टेंबरला वादळी वाऱ्यासह झालेल्या (Heavy rain) अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओढयांना महापुर आला. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कापुस, तुर, सोयाबीन व ईतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहरी व ग्रामीण भागात अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे घर पडले असुन संसार उघड्यावर आला आहे. काहींच्या दुकानात व घरात पाणी शिरल्याने अनेक मोलयवान वस्तू खराब झाल्या आहेत.
काही ठिकाणी जनावरे वाहुन गेले असुन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. काही गावांचा संपर्क तुटत आहे. या (Heavy rain) आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी कारंजा तथा मानोरा तहसीलदार यांच्या कडे करुन ओला दुष्काळ जाहीर करुन आर्थिक मदत द्यावी अशी मागणी माजी आ. अनंतकुमार पाटील यांनी केले आहे.