ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळत केला आनंद व्यक्त
उमरखेड (Maratha Reservation) : गेल्या कित्येक दशकापासून सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला यश आल्याने दीर्घ काळापासून आरक्षणाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठा समाजाकडून उमरखेड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात राज्य शासनाकडून घेण्यात आलेल्या (Maratha Reservation) आरक्षणासंदर्भातील जाहीर करण्यात आलेल्या निर्णयाचे मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात आले.
मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी घेऊन मागील काही काळा पासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा जो संकल्प केला होता तो संकल्प काल दिनांक ३ सप्टेंबर रोजी राज्य सरकारच्या वतीने हैदराबाद गॅजेट सह इतरही मागण्या जरांगे पाटलांच्या आंदोलनापुढे नमत्ो घेत तशा पद्धतीचा अध्यादेश काढावा लागला मनोज पाटील जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठा समाजाकडून जल्लोष करीत आनंद व्यक्त करण्यात आला.
यावेळी मनोज दादा जरांगे समर्थक सचिन घाडगे, आनंद बाबा शिंदे, प्रमोद देशमुख सह चालगणी येथे रामेश्वर पाटील कदम, सुरेश पाटील ,विनोद कदम, सुरेश थोटे, त्रिंबक पाटील थोटे, गणेशराव कदम, उपसरपंच अविनाश थोटे संतोष काटे गजानन थोटे ,ज्ञानेश्वर शिंदे, रामदास थोटे ,रमेश काटे ांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक या ज्ल्लोषादरम्यान उपस्थित होते.