शुक्रवारी 69 उमेदवारी दाखल!
आखाडा बाळापूर (Market Committee Election) : आखाडा बाळापूर येथील बाजार समिती 18 संचालक मंडळासाठी 30 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. 28 जुलै पासून उमेदवारी दाखल प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या दिवशी 7 मंगळवारी दुसऱ्या दिवशी 3 व बुधवार तिसऱ्या दिवशी 7 असे 17 उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर चौथ्या दिवशी 29 रोजी 46 उमेदवारी अर्ज दाखल झाले तर शुक्रवारी शेवटच्या दिवशी 69 असे एकुण 115 उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवसापर्यंत, दाखल झाले असल्याचे बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी (Election Adjudicating Officer) अक्षय गुठे यांनी सांगितले. आखाडा बाळापूर बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सुरू आहे 28 जुलै ते 1 ऑगस्ट उमेदवारी दाखल करण्यात येणार आहे. 18 संचालक मंडळासाठी 30 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. कळमनुरी, औंढा नागनाथ, व हिंगोली तिन तालुक्यातील मिळून 1609 मतदार आहेत.
सहकार मतदार संघात उमेदवारी दाखल!
या उमेदवारी दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत 10 जणांनी उमेदवारी दाखल केली. यात विद्दमान बाजार समीतीचे सभापती दत्ता संजय बोंढारे यांनी सहकार मतदारसंघातून तसेच विद्दमान संचालक दत्ता दिलीप माने यांनी व मारोती सुर्यवंशी, वसंतराव पतंगे, संजय भुरके अशा 5 जणांनी सहकार मतदार संघात उमेदवारी दाखल केली, तर व्यापारी मतदारसंघात सुनील अमिलकंठवार, रोहीतकुमार गोयंका, भाजप जिल्हा उपाध्यक्ष महेश गोविंदवार असे 3 उमेदवारी अर्ज आले होते. तर ग्रामपंचायत मतदारसंघात गणेश देशमुख एकमेव अर्ज दाखल आहे. तिसऱ्या दिवशी सहकारी मतदारसंघात वंदनाबाई रामराव मगर, गजानन माणिकराव काळे, शिवाजी संवडकर, नितीन आनंदराव कदम, यांनी उमेदवारी दाखल केली. तर ग्रामपंचायत मतदारसंघात दिलीप डुकरे यांनी तर अनु. जाती-जमाती संजय भुरके यांनी व भटक्या विमुक्त जाती-जमाती मतदारसंघात (Constituency) पोले विठ्ठल उत्तमराव यांनी उमेदवारी दाखल केली होती.
मोठ्या प्रमाणात उमेदवारी दाखल!
31 जुलै चौथ्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारी (Candidacy) दाखल करण्यात आली. यात व्यापारी मतदारसंघात युवानेता शिवप्रसाद तेलावार, शिवचरण गोयंका, सुनील अमिलकंठवार, बाळासाहेब गावंडे, कृष्णा मधुकर लोलगे, तर सहकारी मतदारसंघात अजय दत्तराव कदम, राजु भाउराव लोंढे, युवानेता ओम कदम, पराग प्रकाशराव अडकीणे, चव्हाण नामदेवराव चंदु, नंदाबाई वसंतराव पतंगे, विजय गावंडे, देशमुख यशवंत दिलीपराव, देशमुख अभिजित दिलीपराव, देशमुख गणेश मुगाराव, पवार मारोती चांदोजी, बोंढारे लक्ष्मण रावजी, निळकंठे अवधूत व ग्रामपंचायत मतदारसंघात शेख मोहम्मद इसा पाशामीयॉं, सुधाकर लोमटे, अमोल उतमराव चव्हाण, खोकले सुदाम भिमराव, बोंढारे लक्ष्मण रावजी, निळकंठे अवधूत, अडकीणे संदीप शामराव, दयानंद मुकींदराव पतंगे, मगर विद्दाधर मगर, मगर संतोष साहेबराव इत्यादी 29 उमेदवारी अर्ज आज दाखल झाले. आजपर्यंत, 46 उमेदवार अर्ज दाखल झाले, तर शेवटच्या दिवशी शुक्रवारी सहकारी संस्था मतदारसंघात रामन दुर्गे, शिवाजी संवडकर, इ.मा.प्रवर्ग विजय गंगेवार, महिला राखीव शेख अकोमुन्नीसा, जयश्री साहेबराव शिंदे, सुवर्णमाला सावळे, साधना कोकरे, लक्ष्मीबाई निळकंठे, निर्मलाबाई वानखेडे, स्वाती चव्हाण, नंदाबाई हाके, मनीषा सांळुखे, सहकारी संस्था माने महेंद्र शिवाजीराव, दत्ता बोंढारे, धनंजय सुर्यवंशी, रावसाहेब अडकीणे, बाजीराव संवडकर, सुधाकर मुलगीर, मन्मथ गंगेवार, अशोक कदम, जितेंद्र पतंगे, वामन विनकर, नरोटे निळकंठ, मारोतराव देशमुख, गजानन काळे, पांडुरंग लोंढे, रोहुलाखान देशमुख, बालाजी वानखेडे, वि ज ना मतदारसंघात सुधाकर मुलगीर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल मतदार संघ आखरे पांडुरंग, दत्तराव सावळे, दयानंद पतंगे ग्रामपंचायत मतदार संघ बालाजी देवकर, रावसाहेब अडकीणे, मन्मथ गंगेवार, संतोष हेंद्रे, अमोल चव्हाण, कीशनराव कोकरे, पांडुरंग लोंढे, हमाल मापाडी मतदारसंघात विद्दमान संचालक मोहम्मद गौस, सय्यद खुतबोद्दीन, कांतराव आमले, मारोती हेंद्रे, गजानन सूर्यभान बोंढारे, भविज मधून नामदेव चव्हाण, इमाव मधून सोमनाथ रणखांब, भविजा बालाजी देवकर इत्यादी 69विविध मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल (Application Filed) झाले असल्याच निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय गुठे यांनी सांगितले.