मानोरा (Washim) :- अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या आज ऑनलाईन (Online) पद्धतीने जाहीर झालेल्या इयत्ता बारावीच्या निकालात (HSC Result) मातोश्री सुभद्राबाई पाटील कला, विज्ञान व कै. पांडुरंग जी ठाकरे वाणिज्य महाविद्यालयाने आपल्या उज्वल यशाची परंपरा यावर्षी सुद्धा कायम ठेवली आहे.
उज्वल यशाची परंपरा यावर्षी सुद्धा कायम
संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, सचिव महादेवराव ठाकरे, संचालक गण व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन एस ठाकरे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्यात. विज्ञान विभागातून 118 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी 60 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 10 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेत . विज्ञान विभागातून दिवेश अतुल राठी 87 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांकाने तर कु. मनस्वी सोनोने79%, माहेश्वरी सवंदळे 79% यांनी द्वितीय क्रमांक व कु नंदिनी पवार व आयुष शेंदुरकर या विद्यार्थ्यांनी 78.50% गुण मिळवून महाविद्यालयातून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेत. कला विभागात 85 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते त्यापैकी 80 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कला विभागाची निकालाची टक्केवारी 95 टक्के आहे. कला विभागातून प्रतिभा सातपुते प्रथम, आर्यन जाधव द्वितीय तर कृष्णाली राठोड तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. वाणिज्य शाखेत 35 विद्यार्थ्यांनी परीक्षेला प्रविष्ट झाले त्यापैकी 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कु. हर्षा ललित इंगोले 81 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली, तर वैष्णवी चोपडे व कुमकुम राठोड द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यात. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाची प्राचार्य एन एस ठाकरे, महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात.