सावली तालुक्यातील घटना
चंद्रपूर/ सावली (MBBS students Death) : गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले तीन विद्यार्थी वैनगंगा नदीपात्रात बुडाल्याची खळबळजनक घटना आज शनिवार दि.१० मे रोजी घडली. ही घटना सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द भागातील नदीपात्रात घडली. गोपाळ गणेश साखरे (२०), रा. चिखली, जि.बुलडाणा, पार्थ बाळासाहेब जाधव (२०) रा. शिर्डी जि.अहमदनगर तर स्वप्नील उद्धवसिंग शिरे (२०) रा.संभाजीनगर असे मृतक विद्यार्थ्यांची नावे आहेत. या (MBBS students Death) तीन विद्यार्थ्यांचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यु झाल्याने खळबळ उडाली आहे. तिघेही एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचे विद्यार्थी होते.
आज शासकीय सुट्टी असल्याने चंद्रपूर – गडचिरोली सीमेवरील व्याहाड खुर्द येथे नदीच्या पुलाखाली वैनगंगा नदीच्या पात्रात गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आठ विद्यार्थी आंघोळीसाठी गेले होते. सर्वच विद्यार्थी आंघोळीसाठी नदीच्या पात्रात उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही व तीन विद्यार्थी बुडाले. तीन विद्यार्थी बुडत असतांना पाच विद्यार्थी बुडण्याच्या भितीने पाण्याच्या बाहेर आले. यावेळी तीन विद्यार्थ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र नदीच्या पात्रात दूरवर वाहून गेले. (MBBS students Death) सध्या उन्हाळा असल्याने नदीचे पात्र कोरडे दिसत असले तरी काही ठिकाणी खोल पाणी आहे.
विद्यार्थांची तिथेच चुक झाली आणि त्यांचा बुडून मृत्यु झाला असे सांगण्यात येत आहे. या (MBBS students Death) घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप पुलरवार हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या विद्यार्थांचे शोधकार्य सुरू आहे. अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले असून रविवारी दुसर्यादिवशी सकाळी पुन्हा शोध कार्य करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या घटनेची माहिती गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच वैनगंगा नदीच्या याच पात्रात महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळी साठी गेलेल्या चंद्रपूर येथील ३ बहिणींचा याच घटनास्थळी मृत्यू झाला होता पुन्हा याच ठिकाणी (MBBS students Death) एमबीबीएस प्रथम वर्गाचे ३ युवक बुडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
