Wani MD case :- शहरात दिवसेंदिवस अमली पदार्थांचा विळखा वाढत असल्याचे समोर येत आहे. स्थानिक गुन्हा शाखा (Local Crime Branch) पथकाने बुधवारी रात्री टिळक चौक येथे दोन तरुणांकडून प्रतिबंधित एम डी ड्रग पावडर (MD Drug Powder)जप्त केला. आरोपी युवकांकडून ३.३८ ग्राम एमडी पावडर, एक बुलेट बाईक व दोन मोबाईलसह तीन लाख चोवीस हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एमडी ड्रग पावडर सह तीन लाखाच्या वर मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हा शाखा पथकाला (Local Crime Branch Team) टिळक चौक येथे अमली पदार्थां बाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने एल सी बी चे कर्मचारी साध्या ड्रेसमध्ये नजर ठेवून होते. रात्री ११ वाजता दरम्यान एका आइस्क्रीम सेंटर व पान टपरीचे मागे एम डी अमली पदार्थांची डिलिंग सुरु असताना एल सी बी पथकाने झडप घालून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता एका पॉलिथीनच्या पन्नी मध्ये ३.३८ ग्राम एमडी पावडर आढळला. पोलिस पथकाने सदर प्रकरणी आरोपी युगांत दिनेश दुर्गे (१९) राह. शिवाजी चौक, विसापूर, जिल्हा चंद्रपूर ह. मु. पंचशील नगर वणी व शहबाज सत्तार मिर्झा (३५) राह. साई नगरी, वणी असे दोघांना अटक करून त्यांचे विरुद्ध ८ (क) २१ (ए), २९ एनडीपीएस अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडून एक बुलेट बाईक व २ स्मार्ट फोनसह ३ लाख २४ हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक सतीश चवरे (स्था. गुन्हा शाखा) यांचे मार्गदर्शनात एपीआय दत्ता पेंडकर, हेडकॉन्स्टेबल सुनील खंडागळे, हेडकॉन्स्टेबल सुधीर पांडे, रजनीकांत मडावी, सलमान शेख, सतीश फुके आदींनी पार पाडली.
