Chandrapur :- येथील सरकारनगर परिसरात एका युवक एमडी पावडर ह्या अमली पदार्थाची विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला (Local Crime Branch) मिळताच त्यांनी सापळा रचून दुचाकी थांबवून युवकाची झडती घेतली असता. ६.६ ग्रॅम एमडी पावडर आढळून आले. या पदार्थासह पोलिसांनी एकूण १ लाख ३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सरकारनगर परिसरातील घटना, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
सदर कारवाई आज १८ ऑगस्ट रोजी करण्यात आली असून आरोपी सौरभ दुर्वास कसारे (२४) याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्ह्याच्या पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोहवा नितीन साळवे, नितीन कुरेकार, दिपक डोंगरे, प्रमोद कोटनाके, पोअं. अमोल सावे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.