खासदार व आमदार विरुद्ध समाज माध्यमावर आक्षेपार्ह माहिती व्हायरल!
बार्शी टाकळी (Media Viral) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शरीरयष्टीला दलित नेत्याचा (Dalit Leader) मुखवटा लाऊन, खासदार व आमदार यांचे विरुद्ध आक्षेपार्ह माहिती समाज माध्यमावर व्हायरल झाली. त्यामुळे राष्ट्रपिता, खासदार व आमदारांचा अवमान झाल्याने भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पोलिसात तक्रार दिली . तसेच ज्यांनी हे कृत्य केले आहे. त्यांनी आपण कोणाच्याही भावना दुखावल्या नसून, शेतकऱ्यांच्या (Farmers) व्यथा लोकप्रतिनिधी पर्यंत पोहोचाव्यात अशा प्रकारचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.
बार्शीटाकळी व पिंजर पोलिसात तक्रार!
बार्शीटाकळी तालुक्यातील किरण ठाकरे हेसर्वपक्ष ग्रुप बार्शीटाकळीचे एडमिन आहेत. या ग्रुप वर तालुक्यातील शेतकरी एल्गार समितीचे (Elgar Committee) कार्यकर्ते तथा भेंडगावचे शेतकरी यांनी खासदार अनुप धोत्रे यांचे व्यंगचित्राचे बाजूला माझा राजकीय जन्म नुकताच झाल्यामुळे मी लहान बाळ आहे, शेतकऱ्यांनी माझ्याकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा ठेवू नये, तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शरीरयष्टीला आमदार हरीश पिंपळे यांचा मुखवटा लाऊन व्यंगचित्रवत्यांच्या बाजूला, अरे शेतकऱ्यांनो म्हातारा झालो असून मला तुझी ढगफुटी दिसत नाही. त्यामुळे तू नमो देवा नमो दवे हे जपकर ,सर्व संकटे दूर होतील. आमदार मुर्तीजापुर, अशा प्रकारचा शब्दप्रयोग केला असून जनहितार्थ शेतकरी एलगार समिती बार्शीटाकळी तसेच बाजूला स्वतःचा फोटो असलेली माहिती या ग्रुपवर नुकतीच व्हायरल झाली आहे.
चुकीची व दिशाभूल करणारी बदनामी!
खासदार व आमदार हे सतत जनता व शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगली कामे करत असल्याने त्यांनी लोकप्रियता काही व्यक्तींना सहन होत नाही. तसेच समाज विघातक व्यक्तींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, खासदार अनुप धोत्रे व आमदार हरीश पिंपळे यांची चुकीची व दिशाभूल करणारी बदनामी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी. अशा प्रकारची तक्रार, बार्शीटाकळी,व पिंजर पोलिसात तालुका अध्यक्ष ग्रामीण चेसंकेत राठोड , विधानसभा प्रमुख महादेव तथा राजूकाकड, तालुका अध्यक्ष गोपाल महल्ले, गजानन आप्पा मळगे, गोवर्धन सोनटक्के, रामेश्वर भांगे, विजय ठाकरे, संदीप चौधरी, तुषार वानखडे, वैभव हातोलकर, राजेश साबळे, सौरभ अग्रवाल, आकाश धात्रक, व रवी हिवराळे यांनी दिली आहे. अशा प्रकारची माहिती राजू पाटील काकडयांनी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या व्यथा लोकप्रतिनिधी पर्यंत पोहोचाव्यात असा उद्देश!
बारशीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके व जमिनीचे पावसामुळे नुकसान झाले आहे. शासकीय मदत शेतकऱ्यांना मिळावी म्हणून संबंधिताकडे निवेदने दिलीत, मोर्चा काढून आंदोलन केले. परंतु शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे शरीरयष्टीचे व्यंगचित्र न काढता शेतकऱ्याच्या व्यंगचित्राला आमदाराचा मुखवटा लावला आहे. त्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी,खासदार अनुप धोत्रे व आमदार हरीश पिंपळे यांचा अपमान होईल .या भावनेने आपण ही माहिती सादर केलेली नाही. विनाकारण या बाबीचा विपर्यास करण्यात येत आहे. एखाद्या आतंकवाद्याविरोधा पोलिसात तक्रारी कराव्यात अशा प्रकारच्या माझ्या विरुद्ध पोलिसात तक्रारी करण्यात येत आहेत. असे मत शेतकरी एल्गार समितीचे तथा भेंडगावचे शेतकरी महादेव गावंडेनी व्यक्त केले.
अल्पसंख्यांक दलित समाजाचे आमदार हरीश पिंपळे यांच्यावर हीन दर्जाचे आरोप केल्याने दलित समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. आमदार दलित आहेत याची जाणीव ठेवून पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा व टाळाटाळ न, करता तात्काळ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असे मत भाजपाचे अनुसूचित जाती चे तालुका अध्यक्ष विजय खिरडकर
सदर तक्रार कलम 356 बी एन एस प्रमाणे नोंद करून घेतली आहे, असे मतपिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडेंनी व्यक्त केले. तक्रार मिळाली असून वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल. असे मत बार्शीटाकळीचे ठाणेदार प्रवीण धुमाळ यांनी व्यक्त केले.