शहराचा ज्ञानेश्वर नगर परिसरात घडली घटना
परभणी/पाथरी (Minor girl Abduction) : पाथरी शहराशेजारील ज्ञानेश्वर नगर येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण अज्ञात अपहरणकर्त्यांनी केल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली दरम्यान सायंकाळी अल्पवयीन मुलीने लातूरमध्ये अपहरण कर्त्यापासून सुटका करून घेतली आहे.
घटने विषयी मिळालेल्या माहितीनुसार शहरा शेजारील देवनांद्रा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ज्ञानेश्वर नगर येथील एका अल्पवयीन मुलीने शुक्रवार २७ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास काही व्यक्तींनी तिचे अपहरण केल्याची माहिती स्वतःच्या फोनवरून वडिलांना दिली. यानंतर या (Minor girl Abduction) मुलीच्या कुटुंबीयांनी पाथरी पोलिसात धाव घेतली होती. यावेळी मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांची तीन पथके तात्काळ सेलू परभणी व माजलगाव च्या दिशेने पाठवली होती. शहरातील सीसीटीव्ही तपासण्यात आल्या.
यावेळी मुलीचा मोबाईल क्रमांक लोकेशन माजलगाव कडे आल्याने या ठिकाणी पथक पाठवण्यात आले होते. परंतु माजलगाव मध्ये हा मोबाईल स्विच ऑफ करण्यात आला. त्यानंतर अपहरणकर्ते व मुलीचा शोध घेणारे पोलीस पथक वापस आले होते. (Minor girl Abduction) दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलीचा फोन वडिलांना पुन्हा आला. यावेळी लातूरमध्ये अपहरणकर्त्यांकडून सुटका करून घेतली असल्याचे तिने सांगितले यावेळी पाथरी पोलिसांनी लातूर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर मुलगी लातूर पोलिसांनी ताब्यात घेतली .मुलीचे कुटुंबीय व पोलिसांचे पथक मुलीला आणण्यासाठी लातूरला रवाना झाले आहे.
दरम्यान राज्यात मागील दोन दिवसात (Minor girl Abduction) मुलींच्या अपहरणाच्या घटना घडल्या असून पाथरीत अल्पवयीन मुलीचे अपहरण कोणी व का केले ? असेल असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सोबतच शैक्षणिक परिसरा शेजारी असलेल्या ज्ञानेश्वर येथे घडलेल्या या घटनेनंतर मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.