परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह येथील घटना दैठणा पोलिसात गुन्हा दाखल….!
परभणी (Minor girl abused) : सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना आरोपीने घरात येऊन धमकी देत अत्याचार केला. त्यानंतर दोघांचे फोटो काढले. घडला प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या खानदानीला खतम करुन टाकीण अशी धमकी दिली. ही घटना परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह येथे २७ मार्च ते १० मे या दरम्यान घडली. पिडितेने दिलेल्या तक्रारीवरुन १२ मे रोजी दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडित मुलीने दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, २७ मार्चला पिडिता घरात एकटी असताना रात्री दहाच्या सुमारास आरोपी घरात आला. त्याने मुलीवर अत्याचार केला. दोघांचे फोटो काढले. तसेच (Minor girl abused) पिडितेला व तिच्या परिवाराला खतम करुन टाकण्याची धमकी दिली. यानंतर १० मे रोजी पिडितेच्या आईला आरोपीने तुमच्या मुलीचे लग्न माझ्या सोबत करुन द्या नाहीतर तिचे कोठेही लग्न होऊ देणार नाही, असे म्हणत पिडिता व तिच्या आईला शिवीगाळ करुन धमकी दिली.
यानंतर काही दिवसांनी पिडितेला तु माझ्या सोबत लग्न केले नाहीतर तुझे फोटो व्हायरल करीन अशी धमकी दिली. या (Minor girl abused) प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन आकाश उर्फ ज्ञानेश्वर बानाईत याच्यावर दैठणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दैठणा पोलीस अधिक तपास करत आहेत.




