Pandharkawda :- तालुक्यातील आकोली बु येथील दागाडी पोडावरील एका अल्पवयीन मुलीवर त्याच गावातील एका आरोपीने तिला बळबजरीने उचलुन नेवुन अत्याचार (torture) केल्याची घटना आज २१ रोजी दुपारी १२.३० वाजता दरम्यान घडली. याबाबत सदर मुलीने आपल्या आईसह पांढरकवडा पोलीस स्टेशन मध्ये येवुन आरोपी विरुध्द तक्रार नोंदविल्याने पोलीसांनी आरोपी विरुध्द विविध कलमासह पोकसो (POCSO)अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
शेतातील शौचालयात नेऊन बळजबरीने अत्याचार..
नितेश कानु मेश्राम रा दागाडी पोड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी अल्पवयीन मुलगी हि बाहेर जात असतांना आरोपीने तिचा पाठलाग केला. तिला मागुन बळजबरीने पकडुन नेले व लगतच्या एका शेतातील शौचालयात तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. मुलीने आरडा,ओरड केली असता, आरोपीने तिला मारण्याची धमकी दिली. घडलेला प्रकार मुलीने घरी जावुन आपल्या आईस सांगितला. तेव्हा त्या दोघीही तक्रार करण्यास पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये आल्या. मुलीच्या फिर्यादी वरुन पोलीसांनी आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला असुन ते आरोपीच्या शोधात रवाना झाले आहे.




