Wani :- सोमवार १८ ऑगस्ट रोजी सकाळी वागदरा गावातील ४ दिवसापासून बेपत्ता असलेल्या ६० वर्षीय व्यक्तीचा मंदर गावाजवळील एका बार मागील शेतशिवारात नग्नावस्थेत मृतदेह (dead body) सापडला. या इसमाचा खून (murder) केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृतक हा भंगार वेचण्याचा काम करीत होता व मागील ४ दिवसांपासून घरून बेपत्ता होता
सकाळी त्या दिशेने गेलेल्या काही लोकांना तब्बल ६० वर्षीय इसमाचा नग्नावस्थेत (Nudity) मृतदेह दिसून पडला. मृतकाचे नाकातून व कानातून रक्त निघून होते. प्रत्यक्षदर्शीनी इसमाचा रक्तरंजित अवस्थेत मृतदेह पडून असल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस स्टेशनला(Police station) कळविण्यात आले. मृतकाचे नाव देवराव गुंजेकर (६०), राह. वागदरा असल्याचे नातेवाईकाने सांगितले. तसेच मृतक हा भंगार वेचण्याचा काम करीत होता व मागील ४ दिवसांपासून घरून बेपत्ता होता. मृतक याचा मृत्यू कसा झाला असावा.? घातपात की आणखी काही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.