रिसोड (Risod) :- भर जहागीर जिल्हा परिषद (Zilla Parishad) सर्कल अंतर्गत शिवसेना शिंदे गटाचे संघटन बांधणी, सदस्य नोंदणी, शाखा स्थापना, बुथ बांधणी आणि पक्ष प्रवेश कार्यक्रमा निमित्त आ.गवळी यांचा दौरा ता. 13 मार्च पासुन जिल्हा संघटक अनिल गरकळ यांनी आयोजित केला आहे.
जिल्हासंघटक अनिल गरकळ यांचा पुढाकार
विधान परीषद आमदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात शिवसेना (Shivsena) जिल्हा संघटक अनिल गरकळ यांनी भर जहागीर जिल्हा परीषद सर्कल अंतर्गत पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी ता.13 मार्च ते 19 मार्च दरम्यान भर जहागीर, मोरगव्हाण, वाडी, चाकोली, मोप, कन्हेरी, बोरखेडी, शेलुखडशे, पाचांबा, गणेशपुर, मांगवाडी या गावामध्ये संघटन बांधणी, सदस्य नोंदणी अभियान, बुथ बांधणी, आणि पक्ष प्रवेशाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या साठी शिवसेना शिंदे गटातील माजी.जि.प.सदस्य अनिल गरकळ, अमोल नरवाडे, शिवसेना ओबिसी तालुका अध्यक्ष रामेश्वर राऊत, कृषी सेना तालुका प्रभुख ज्ञानेश्वर भोसले, डाॅ.उत्तमराव गि-हे, युवासेना उपतालुका प्रमुख शेषनारायण कोकाटे, डाॅ.प्रल्हाद कोकाटे, अशोक नरवाडे, निवृत्ती कोकाटे, शंकर कोकाटे, प्रकाश चोपडे, तालुका उपप्रमुख नारायण खडशे, डाॅ.विलास ठाकरे, जगन चोपडे, बळीराम चोपडे, रमेश चोपडे, परमेश्वर चोपडे, सिध्देश्वर सुर्यवंशी, शाम कोकाटे, मंगेश आघाव, परमेश्वर ढाकणे, रंगराव खडशे, संजय पारडे, याचा सहभाग राहणार आहे.