सहाव्या दिवशी ही उपोषण सुरूच
परभणी/गंगाखेड (MLA Gutte) : आ. रत्नाकर गुट्टे व गंगाखेड शुगर्स साखर कारखान्याविरुद्ध तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास (hunger strikers) बसलेल्या उपोषणार्थीची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली असून सहाव्या दिवशी ही उपोषण सुरूच असल्याने उपोषणास बसलेल्या ७६ वर्षीय वयोवृध्द इसमाच्या उपोषणाची प्रशासन दखल घेणार का? असा सवाल करत तालुक्यातील ऊस वाहतूक ठेकेदार व संतप्त नागरिक उपोषणास पाठींबा देत उद्या दि. २६ ऑगस्ट सोमवार रोजी बस स्थानक ते तहसील दरम्यान निषेध मोर्चा काढणार आहे.
असा सवाल करत संतप्त नागरिक आज काढणार निषेध मोर्चा
गंगाखेड शुगर्स साखर कारखान्याचे चेअरमन आ. रत्नाकर गुट्टे (MLA Gutte) यांनी ऊस वाहतुकीचे पैसे न देता उलट वाहतूक करारासाठी दिलेल्या कागदपत्रां आधारे परस्पर उचललेल्या कर्जामुळे बँकेकडून वसुलीच्या नोटीस येत असल्याने व सिबिलसुद्धा खराब झाल्यामुळे कर्ज मिळत नाही. या कारणामुळे त्रस्त झालेल्या तालुक्यातील इसाद येथील वयोवृध्द ऊस वाहतूक ठेकेदार भगवान रोहिदास भोसले यांनी दि. २० ऑगस्ट रोजी पासून गंगाखेड शुगर व चेअरमन आ. रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात गंगाखेड तहसील कार्यालयासमोर आमरण (hunger strikers) सुरू केले आहे.
या उपोषणाला दि. २५ ऑगस्ट रविवार रोजी सहावा दिवस उजाडला तरी प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने तालुक्यातील ऊस वाहतूक ठेकेदारांसह संतप्त नागरिक सोमवार रोजी सकाळी १० वाजता उपोषणाला पाठींबा दर्शवित गंगाखेड बस स्थानक ते तहसील कार्यालया दरम्यान निषेध मोर्चा काढून निवेदन सादर करणार आहेत.