गावोगाव पाहणी करीत आमदार रमेशआप्पांची आपदग्रस्तांना ग्वाही!
महादेव कुंभार
लातूर (MLA Rameshappa karad) : बॅरेजचे नादुरुस्त दरवाजे तात्काळ दुरुस्त करा, ते दुरुस्त होत नसतील तर ते दरवाजे गॅस कटरने तोडा, पण शेतकऱ्यांच्या शेतीत तुंबलेले पाणी तात्काळ निचरा करा, असे आदेश जलसंपदा विभागाला दिले. भिसेवाघोली येथे रस्त्यालगतच्या धोकादायक विहिरीवर संरक्षण भिंत बांधण्याचे, तसेच निळकंठ येथील पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून नवीन पुलाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ‘आपण धीर सोडू नका, आपले सरकार, आपल्या सोबत आहे आणि तुम्हाला निश्चितपणे मदत मिळेल!’अशी ग्वाही लातूर ग्रामीणचे तडफदार (MLA Rameshappa karad) आमदार रमेश आप्पा कराड यांनी अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्तांना दिली.
अतिवृष्टी आणि महापुराची परिस्थिती निर्माण झाली असताना लातूर ग्रामीणचे (MLA Rameshappa karad) आमदार रमेशआप्पा कराड यांनी लातूर, औसा व रेणापूर तालुक्यातील गावोगाव भेटीचा सिलसिला अद्यापही कायम ठेवला आहे. अतिवृष्टी आणि महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करत आपल्या मतदारसंघातील ग्रामस्थांना शेतकऱ्यांना त्यांनी धीर देण्याचे काम चालविले असून सरकार या आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही दिली.
जमिनीवरचा आमदार गावोगावी पोहोचल्याने ग्रामस्थही मोठ्या संख्येने त्यांच्याकडे आपत्ती काळात मदतीसाठी मागणी करीत आहेत. नागझरी, जेवळी, टाकळी, काटगाव, काटगाव तांडा, तांदूळजा, कानडी बोरगाव, निळकंठ, भोसा, मसला, भिसे वाघोली, माटेफळ यांसह अनेक गावांचा सखोल पाहणी दौरा आमदार कराड यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासूनच्या अतिवृष्टीमुळे खरिपातील हाताशी आलेले सोयाबीन, ऊस यांसारखी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणी मांजरा नदीसह ओढ्यांना आलेल्या पुरामुळे जमिनी मोठ्या प्रमाणात खरडून गेल्या… अनेकांच्या घरांचीही पडझड झाली… शेतकऱ्यांच्या बांधावर उभा राहून त्यांच्या अडीअडचणी आणि व्यथा ऐकताना मन हेलावून गेले, अशी भावना (MLA Rameshappa karad) आमदार रमेशआप्पा कराड यांनी व्यक्त केल्या.
मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही!
‘अशा संकटाच्या काळात महायुतीचे शासन आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे जलद आणि अचूक पूर्ण करण्याचे, तसेच मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत’, असेही रमेशआप्पा कराड (MLA Rameshappa karad) यांनी ठिकठिकाणी शेतकरी व ग्रामस्थांना आश्वस्त केले.