आरोग्याचा कणा मजबूत करण्यासाठी आ. गायकवाड यांचा प्रयत्न !
बुलढाणा (MLA Sanjay Gaikwad) : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी एन. आर. एच. एम. अंतर्गत तब्बल 14 कोटीचा निधी खेचून आणला आहे. या निधीच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील आरोग्यसेवा अधिकच बळकरीकरणास मदत मिळणार आहे.
बुलढाणा विधानसभा मतदार संघात आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी विकासाचा झंजावात उभा केला आहे. जवळपास सर्वच क्षेत्रात त्यांनी भरगच्च विकास केला असून, मतदार संघातील आरोग्य सुविधा अधिक बळकट व्हावी याकरिता आता त्यांनी राष्ट्रीय आरोग्य सेवा अंतर्गत 14 कोटी चा निधी खेचून आणला आहे. या निधीच्या माध्यमातून मतदार संघात विविध विकास कामे केली जाणार आहे. यात मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी येथील पीएचसी मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे राहण्याची दर्जेदार सुविधा नसल्याने कर्मचारी दुसऱ्या शहरातून ये-जा करत होते परिणामी त्याचा परिणाम आरोग्यसेवक पडत होता.
या कर्मचाऱ्यांचे अडचणी पाहता आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी या ठिकाणी पीएचसी ची मुख्य इमारत व कर्मचाऱ्यांसाठी नवीन दर्जेदार निवासस्थाने बांधकामासाठी तब्बल 1 कोटी 43 लाख रुपये उपलब्ध करून दिले आहे. तर बुलढाणा येथील स्टाफ क्वार्टरसाठी नवी इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीसाठी 3 कोटी 65 लाख विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. बुलढाणा या ठिकाणी आरोग्यशी संबंधित असलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हास्तरावरच दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध व्हावे याकरिता जिल्हा प्रशिक्षण केंद्राची नवीन इमारत उभी केली जाणार आहे. सदर टोले जंग इमारतीसाठी तब्बल 8 कोटी 97 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे या ठिकाणी केंद्र शासनाची व राज्य शासनाची माहिती त्यांना मिळावी, याकरिता विशेष कक्ष देखील उपलब्ध करून दिला जाणार आहे.