श्री. राणीसती दादी मंदिर परिसरात खाटु श्याम मंदिर उभारण्याचा संकल्प
हिंगोली (MLA Santosh Bangar) : शहरातील राजस्थानी समाजाने शहरालगत असलेल्या गंगानगर परिसरातील श्री राणी सती दादी मंदिर परिसरात खाटू श्याम मंदिर (Khatu Shyam temple) उभारण्याचा संकल्प केला आहे. या भव्य कामासाठी निधी जमवण्याच्या दृष्टीने नुकतीच राजस्थानी समाज बांधवांनी शहरातील सिटी क्लब परिसरात एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीला कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांना विशेषत्वाने निमंत्रित करण्यात आले होते. राजस्थानी समाज बांधवांनी यावेळी त्यांना मंदिर उभारणीच्या कामाची माहिती देऊन (Khatu Shyam temple) खाटू श्याम मंदिरासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी केली. आमदार संतोष बांगर यांनी समाजाच्या या धार्मिक कार्याला सकारात्मक प्रतिसाद देत, ‘या पवित्र कार्यासाठी निधी कमी पडू देणार नाही,’ असे ठोस आश्वासन दिले. त्यांनी दिलेल्या या आश्वासनामुळे राजस्थानी समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
आ. बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या या महत्त्वपूर्ण मदतीच्या भूमिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, मंदिर समितीच्या सर्व पदाधिकार्यांच्या वतीने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक गणेश बांगर हे बैठकीस उपस्थित होते. (Khatu Shyam temple) मंदिर समितीचे पदाधिकारी तसेच राजस्थानी समाजातील रमेशचंद्र बगडिया, राम कयाल, संजय देवडा, गोपाल अग्रवाल, पंकज अग्रवाल, भगवान दाजी अग्रवाल, रितेश अग्रवाल, ज्ञानू रामजी जांगिड, नितीन अग्रवाल, ताराचंद धूत, सुनील बगडिया, अजय बगडिया, विकी वरूडवाले, सचिन अग्रवाल , प्रविन बगडिया, सुनील व्यास, सचिन अग्रवाल, कचरू अग्रवाल यांसह अनेक प्रतिष्ठित समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजस्थानी समाजाच्या या नवीन मंदिर उभारणीच्या प्रयत्नांना आमदार बांगर यांच्या मदतीच्या शब्दाने मोठा आधार मिळाला आहे.