Wardha :- मोबाईल चोरी करणार्यास रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर, रेल्वे पोलीस वर्धा यांनी ही संयुक्त कारवाई केली. आरोपीकडून १३ मोबाईल जप्त करण्यात आले.
लोहमार्ग स्थानिक गुन्हे शाखा नागपूर, वर्धा रेल्वे पोलिसांची संयुक्त कारवाई
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव तुळशीदास दामोदर राठोड (वय ३५), रा. गडचांदूर, ता. कोरपणा, जिल्हा चंद्रपूर(chandrapur) असे असल्याचे सांगण्यात आले. तुळशीदास राठोड याच्याकडून ९० हजार रुपये किमतीचे ४ मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपी हा पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यास अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी (Police custody) सुनावण्यात आली होती. गुप्त बातमीदाराद्वारे मिळालेल्या माहितीवरून व तांत्रिक पद्धतीने तपास करून पोलिस कोठडीदरम्यान आरोपीकडून एक लाख ९० हजार रुपये किमतीचे ९ मोबाईल जप्त करण्यात आले.
पोलिस कोठडीदरम्यान आरोपीकडून 1 लाख 90 हजार रुपये किमतीचे ९ मोबाईल जप्त
ही कारवाई नागपूर लोहमार्ग पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड, लोहमार्ग अकोला विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch) प्रभारी अधिकारी पंजाब डोळे, रेल्वे पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी पंकज ढोके, लोहमार्ग नागपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार महेंद्र मानकर, पोलीस नाईक नितीन शेंडे, रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कांबळे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार संतोष वडगिरे, पोलीस शिपाई चंदन डेहनकर, पंकज भांगे, संदेश लोणारे, गोपनीय शाखेचे पोलीस शिपाई दिनेश भावे यांनी केली. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.