डोंबिवली/ठाणे(Thane):- मुंबईहून कल्याणला एक्स्प्रेसने (Express)येत असताना गर्दीचा गैरफायदा घेत एका २३ वर्षीय नोकरदार तरुणाने एका २२ वर्षीय सॉफ्टवेअर डेव्हलपर (Software developer) तरुणीचा विनयभंग(molestation) केला. या महिलेने सदर तरुणाला जाब विचारून ही माहिती तात्काळ रेल्वे पोलिसांना विली.
वासनांध तरुणाला लॉकअपची हवा
पोलिसांनी या महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा नौडवून तरुणाची रवानगी पोलीस लॉकअपमध्ये (Police lockup) केली आहे. तकारद्वार तरुणी कल्याण परिसरात राहते. ली सॉफ्टतेंअर डेव्हलपर आहे. या संदर्भात लोहमार्ग पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी चार दिवसांपूर्वी रात्री दहा ताजण्याच्या दरम्यान एक्स्प्रेसने मुंबईहून कल्याणच्या दिशेने येत होती, एक्स्प्रेसमध्ये गर्दी होती. बसण्यास जागा न मिळाल्याने ती एक्स्प्रेसमध्ये उभी राहून प्रवास करत होती. तिच्या शेजारी २३ वर्षीय तरुण उभा होता. हा तरुण सदर तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. वाद नको म्हणून या तरुणीने सुरुवातीला त्या तरुणापासून दूर उभे राहण्याचा प्रयत्न केला. कल्याण रेल्वे स्थानक्त येण्यापूर्वी या तरुणाने सदर तरुणीला खेटून अश्लील कृत्य (obscene act)करू लागला. हा सारा प्रकार डब्यातील गर्दीमध्ये इतर प्रवाशांसमोर सरू होता.




