सरकारकडून तातडीने यांवर उपाययोजना करण्याची मागणी!
कोरेगाव, चोप (Monsoon Session) : आता मुंबई येथे पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सुरुवात झाली आहे. यात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम (MLA Ramdas Masram) यांनी विरोधी पक्षाचे 293 शेतकरी प्रस्ताव राज्य व जिल्हा यातील समस्या विधानसभेत (Legislative Assembly) अधोरेखित करीत राज्यातील आणि विशेषता गडचिरोली जिल्ह्यातील समस्यां उपस्थित केल्या. गडचिरोली जिल्ह्यातील शेती विषयक अडचणी, बाजार समित्यांचे कार्य,उत्कृष्ट बियाण्याचा तुटवडा, अनुदानाचा अपुरा लाभ, विजेचा प्रश्न विजेची लोड शेंडीग व नवीन कृषी विज कनेक्शनचा जोडनीप्रश्न, स्टील हब, विमानतळ, सिंचन, जंगली प्राण्यांचा पश्न, पिकाला हमीभाव यासारख्या अनेक प्रश्नांवर रामदास मसराम यांनी सरकारचे (Govt) लक्ष वेधले व सरकारकडून तातडीने यांवर उपाययोजना (Measures) करण्याची मागणी आमदार रामदास यांनी केलेली आहे.