बॅकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा मार्ग मोकळा
चंद्रपूर (Chandrapur District Bank ) : न्यायालयाच्या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीला दररोज नविन कलाटणी मिळत आहे. आज शुक्रवारला न्यायालयाने प्रारूप मतदार यादीला दिलेली स्थगिती हटविली असल्याने आता (Chandrapur District Bank) बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयामुळे पून्हा बँकेच्या संचालक मंडळात कही खुशी कही गम अशी स्थिती आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी निवडणुकीची प्रक्रीया अंतिम टप्प्यात असतानाच न्यायालयाने प्रारुप मतदार यादीला स्थगिती दिली होती. त्यामुळे काही संचालक मंडळात प्रचंड अस्वस्थता होती. तर सत्तेत सहभागी संचालक आनंदात होते. मात्र आता न्यायालयाने शुक्रवारी प्रारूप मतदार यादीला दिलेली स्थगिती हटविली आहे.
सन २०१२ पासून विद्यमान संचालक मंडळ कार्यरत आहे. दरम्यानच्या काळात न्यायालयाने संचालक मंडळाचे अधिकार काढले आणि विहीत मुदतीत निवडणुक घेण्याचे आदेश दिले. २१ एप्रिल २०२५ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली. त्यानंतर ३० एप्रिलपर्यंत त्यावर आक्षेप, हरकती मागविण्यात आल्या. ७ मे रोजी या आक्षेप, हरकतीवर सुनावणी झाली. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, नागपूर यांनी या हरकती आणि आक्षेपांवर निर्णय देण्याची प्रक्रीया १३ मे पासून सुरु केली. निर्णय देण्याचा १४ मे हा शेवटचा दिवस होता. त्याच दिवशी प्रारुप मतदार यादीला न्यायालयाने स्थगिती दिली.
सेवा सहकारी संस्था, वलनीचे तात्या चौधरी यांनी प्रारुप मतदार यादीतील एका नावावर आक्षेप घेतला होता. मात्र विभागीय सहनिबंधकांनी त्याचा आक्षेप फेटाळून लावला. ते न्यायालयात गेले आणि स्थगिती देण्यात आले. त्यानंतर (Chandrapur District Bank) बँकेने न्यायालयात आज आपली बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने स्थगिती हटविली. मात्र सेवा सहकारी संस्था, वलनी संदर्भात स्थगिती कायम आहे.
या संस्थेला आपले म्हणणे तीन दिवसात मांडायचे आहे. आज १६ मे अंतिम यादी प्रसिद्ध होणार होती. परंतु न्यायालयाच्या स्थगानदेशामुळे ते होवू शकले नाही. आता न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर विभागीय सहनिबंधकांच्या आदेशाने निवडणुकीची प्रक्रीया पुन्हा सुरु होणार आहे. (Chandrapur District Bank) बँकेच्या निवडणुकी संदर्भात न्यायालयाचे निर्णय येत असल्याने दररोज नविन घडामोडी घडत आहेत.