परभणीत पदाधिकारी संवाद मेळाव्याला प्रतिसाद!
परभणी (MP Sunil Tatkare) : हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा (Nationalist Congress) बालेकिल्ला राहिलेला आहे. काही वर्ष गॅप झाला आहे. तो आता भरुन काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे. दिलेला शब्द पाळणारा पक्ष म्हणून आपली ओळख असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी नेहमी राहणार असा शब्द प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी येथे दिला.
नव पर्वाचा पदाधिकारी संवाद मेळावा पार पडला!
परभणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निर्धार नव पर्वाचा पदाधिकारी संवाद मेळावा शनिवारी दुपारी तीन वाजता पार पडला. यावेळी व्यासपीठावर आ. धनंजय मुंडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सुरज चव्हाण, आ. विक्रम काळे, माजी खा. आनंद परांजपे, आ. राजेश विटेकर, माजी आ. विजय भांबळे, शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, युवा नेतृत्व अक्षय देशमुख, रोहण सामाले, दादासाहेब टेंगसे, भावनाताई नखाते, नंदाताई राठोड, विठ्ठलराव सुर्यवंशी, वसंतराव शिरस्कर, किरण तळेकर, अनिल नखाते, एकनाथ साळवे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे ही बहुजन हिताची आहेत.
निवडणुका लढविण्याचा निर्धार!
यशवंतराव चव्हाण यांचा सुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्याचे काम केले जात आहे. काही चांगले निर्णय एनडिए सरकार घेत असल्याने आम्ही त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. सत्तेत गेल्या शिवाय लोकांची सेवा व प्रश्न सोडवता येत नाहीत. आजही फुले, शाहु, आंबेडकर यांच्याच विचारांचा वारसा घेऊन पक्षाची कामे केली जात आहेत. परंतु विरोधकांनी अल्पसंख्यांक, दलित, आदीवासी समाजाला पक्षाच्या विरोधात अपप्रचार करुन लांब करण्याचा प्रयत्न केला. लोकसभेला (Lok Sabha) फटका बसला पण विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (Nationalist Congress Party) आपली बाजू भक्कम असल्याचे सिध्द केले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे दिलेला शब्द पाळतात. हे आ. राजेश विटेकरांना विधान परिषदेवर घेऊन दाखवून दिले. परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीची एक चांगली युवा टिम तयार झाली आहे. त्यामुळे येणार्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये (Local Self-Government Elections) राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम होणार आहे. युवांना जास्त संधी देणार असल्याचे आश्वासन खा. सुनील तटकरे यांनी दिले. या मेळाव्यात रुपाली चाकणकर, आ. धनंजय मुंडे, प्रताप देशमुख, माजी आ. विजय भांबळे यांनीही उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
जनतेचे प्रश्न सोडवा!
– आ. राजेश विटेकर
आज शेतकरी, कामगार व नागरीकांचे (Citizens) काय प्रश्न आहेत, हे सोडविण्यावर भर आहे. प्रलंबीत पिम्याचा प्रश्न मार्गी लावला. जायकवाडी कालव्यातून शेतकर्यांना पाणीसोडले आणि विकासाची कामे करण्याचा प्रयत्न सुरू केला. राष्ट्रवादीची ओळखच लोकांची कामे करणार पक्ष म्हणून असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा, असे आ. राजेश विटेकर यांनी आवाहन केले. तसेच येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकविणार असल्याचा शब्द प्रदेशाध्यक्षांना दिला.