स्वच्छतेची जबाबदारी नगर पालिकेवर सोपविल्याने स्वच्छतेवर पालिका प्रशासनाने भर!
हिंगोली (Municipal Corporation) : हिंगोली येथील रामलीला मैदानावर श्री सार्वजनिक दसरा महोत्सवाची औद्योगिक व कृषि प्रदर्शनी भरविण्यात आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या स्वच्छतेची (Cleanliness) जबाबदारी नगर पालिकेवर सोपविल्याने स्वच्छतेवर पालिका प्रशासनाने भर दिला आहे.
कंत्राट घेऊन सुध्दा स्वच्छतेकडे कंत्राटदाराने दुर्लक्ष!
मागील वर्षी रामलीला मैदानावर स्वच्छते करीता बाहेर जिल्ह्यातील कंत्राटदाराला काम देण्यात आले होते. परंतु स्वच्छते बाबत मैदानावरील व्यवसायीकांसह नागरीकांची चांगलीच ओरड झाली होती. कंत्राट घेऊन सुध्दा स्वच्छतेकडे कंत्राटदाराने दुर्लक्ष केले होते. औद्योगिक व कृषि प्रदर्शनी (Agricultural Exhibition) संपल्यानंतरही काही दिवस कचरा जैसे थे पडलेला होता. शेवटी नगर पालिकेला रामलीला मैदानावरील स्वच्छता करावी लागली. त्यामुळे यावर्षी महोत्सव समितीने बदल करून त्याची जबाबदारी नगर पालिकेवर सोपविली. मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांनी मैदानावर स्वच्छते करीता दोन पथक नेमले आहे. ज्यामध्ये १५ महिला व १७ पुरूषांचा समावेश आहे. गोळा केलेला कचरा उचलून वाहनातून डंम्पिंग ग्राऊंडवर नेऊन टाकला जात आहे.