शेकडो मुस्लिम बांधव सहभागी
आखाडा बाळापूर/हिंगोली (Muslim Samaj Mukmorcha) : कानपूर येथील घटनेचा निषेध करून शुक्रवारी जुमा नमाज नंतर आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात मुस्लिम समाज वतीने मुकमोर्चा काढून पोलिसांना निवेदन देण्यात आले. कानपूर येथे आय लव्ह मोहम्मद असे लिहल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले. यामुळे (Muslim Samaj Mukmorcha) मुस्लिम समाजात याबद्दल मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. या अन्यायकारक कार्यवाही निषेधार्थ तसेच समाजामध्ये शांती एकतेचा संदेश देण्यासाठी शुक्रवारी टिपू सुलतान चौक येथून पोलीस स्थानकावर मुकमोर्चा काढून कानपूर येथे मुस्लिम समाज जो गुन्हा दाखल करण्यात आला त्याचा निषेध करण्यात आला. पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांना मुस्लिम समाज वतीने निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी मोहम्मद जकी कुरेशी, शेख जाहिर , सय्यद अहेमद, रिजवान कुरैशी, शेख अज्जु, शेख रिजवान,इंजि. शेख गुलाम कुरैशी, मतीन कामले,नईम नाईक, तहेसीन बेग,रशीद खान,शेख सद्दाम रजा, शानू शेख,ख़्य्यूम शेख,ऐजाज शेख, माजिदखान पठान ,खुर्शीद सैय्यद ,नदीम सैय्यद,ज़मीर शेख,असलम शेख,सोहेल शेख,मजहर शेख,रमीज शेख,सलीम शेख,मुशीर शेख,अहमद सैय्यद ,सूफियान शेख,नावेद सैय्यद,गुफरान कुरेशी ,इरफान कुरेशी,अलफराज कुरैशी, अयाज रज़ा ,मतीन रज़ा ,रिशाद पठान,साहिल रज़ा ,साजिद सैय्यद,सद्दाम शेख,शेख अफसर,सय्यद इमरान, मोहम्मद शेख, शेख अकबर,आखीब पठाण सह आखाडा बाळापूर,शेवाळा,रूद्रवाडी,येलकी,घोडा (Muslim Samaj Mukmorcha) मुस्लिम समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, असे शेख जहीर व माजीदखान पठाण यांनी सांगितले.
यावेळी पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, सपोनी ज्ञानेश्वर बसवंते, डीएसबीचे अतुल मस्के, पंढरीनाथ चव्हाण, राजु ठाकूर व पोलीस पथकाने यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.