जिल्हाधिकार्या कडे शेतकर्यांचे शक्तीपीठ महामार्ग करण्याचे निवेदन
शक्तिपीठ महामार्गाला डोंगरकडा ते गिरगाव शेतकर्याचा तीव्र विरोध
हिंगोली (Shaktipeeth Highway) : समृध्दी महामार्गा प्रमाणे नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित असून हा महामार्ग डोंगरकडा ते गिरगाव या परिसरातून जाणार आहे. मात्र तेथील शेतकरी हे सधन असून याला शेतकर्यांनीच तिव्र विरोध केला आहे. या प्रस्तावित (Shaktipeeth Highway) महामार्गात बदल करून डोंगरकडा फाटा ते येडशी, सिंदगी, पांगरा शिंदे, लोहरा, लक्ष्मण तांडा, दरेगाव, औंढा नागनाथ परिसरातून हा शक्तीपीठ महामार्ग करण्यात यावा अशी मागणी या परिसरातील शेतकर्यांनी जिल्हाधिकार्याकडे २९ जुलै रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा, गिरगाव, वसमत या भागातील शेतकर्याच्या जमिनी ह्या ओलिताखाली असून अनेक गावे सधन आहेत. त्यांना बाराही महिने पाण्याची सोय असल्यामुळे केळी व इतर पिके काढली जातात. त्यामुळे तेथील शेतकरी हे सधन असल्याने नागपूर-गोवा (Shaktipeeth Highway) शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित असून काही शेतकर्यांनी या शक्तीपीठ महामार्गाला तिव्र विरोध केला आहे.
मात्र शासनाने याउलट विचार करून प्रस्तावित नागपूर-गोवा (Shaktipeeth Highway) शक्तीपीठ महामार्ग वारंगा फाटा, येडशी, बोथी, सिंदगी, जांब, बोल्डा, पांगरा शिंदे, लोहरा खु., लोहरा बु., लक्ष्मण नाईक तांडा, दरेगाव, औंढा नागनाथ परिसरातील कायम दुर्लक्षीत भागाचा विकास होण्याकरीता मुंबई-पुणेकडे कामाच्या शोधात स्थलांतराचे प्रमाण कमी होणार आहे. नागरीकांना रोजगाराच्या काही संधी मिळून जमिनीचे बाजार भाव कमी असल्याने शासनास हा महामार्ग झाल्यास त्याचा फायदा होणार आहे.
तसेच या भागातील शेतकरी नागपूर-गोवा (Shaktipeeth Highway) शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी देण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे या भागातून जाणार्या शेतकर्यांसह नागरीकांचा कोणताही विरोध नसणार आहे. तसेच हा महामार्ग तयार करण्यासाठी आवश्यक मुरुम व आवश्यक खनिज संपत्ती उपलब्ध होणार आहे.
तसेच या मागास भागाचा विकासाचा विचार करून प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या हिंगोली जिल्ह्यातील महामार्गात बदल करून या भागातून महामार्ग काढण्यात यावा, अशी मागणी या भागातील शेतकरी विठ्ठल रामसिंग पवार, अॅड. संतोष योगीराज राठोड, अरविंद पवार, विजय राठोड, अंबादास जाधव, रितेश पवार, संतोष चव्हाण, देवानंद जावळे, श्रीपाल जाधव, गजानन राठोड, विजय कनिराम राठोड, संदिप राठोड यांच्यासह अनेक शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे २९ जुलै रोजी निवेदन देवून मागणी केली आहे.