नागपूरचा विकास करण्याऐवजी शहराला उद्ध्वस्त केल्याचा आरोप
नागपूर (Nagpur Heavy rain) : काल शनिवार पहाटेपासूनच शहरात पावसाला सुरुवात झाली. पावसाची तीव्रता वाढल्यामुळे शहरातील सखल भागात पाणी (Nagpur Heavy rain) साचले. त्यात प्रामुख्याने पिवळी नदी, कळमना, नारा, नंदनवन झोपडपट्टी, नरेंद्र नगर, भांडेवाडी, शिवशक्ती नगर, मानकापूर येथील वस्त्यांचा समावेश आहे. भाजपने 17 वर्षे महापालिकेवर सत्ता गाजवली पण नागपूरचा विकास करण्याऐवजी शहराला उद्ध्वस्त केल्याचे काम भाजपने केला आहे. ज्यामुळे काही नागरिकांच्या घरांतदेखील पाणी शिरले. पावसाने भाजपच्या विकासाची पोलखोल केली असून, भाजपने विकासाच्या नावावर नागपूरकरांसोबत मोठा फ्रॉड केला असल्याचा आरोप, नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांनी केला.
सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातही पाणी तुंबल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले. घरातून पाणी काढताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पावसाने घातलेल्या थैमानामुळे (Heavy rain) नागरिकांच्या घरातील साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे झाडे देखील कोसळली. यावेळी मोठ्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले आहे. आता (Nagpur Control) शासनाने नागरिकांना झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी डॉ. राऊत (Dr. Nitin Raut) यांनी केली.
प्रशासनाच्या संथपणावर नाराजी
पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊसमुळे (Heavy rain) शहरातील अनेक भागांसह उत्तर नागपुरातील सखल भागात असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले. उत्तर नागपुरात इंदोरा, जरीपटका, नारा, पिवळी नदी, चांभार नाला, कळमना परिसरात पाणी शिरले. विशेष म्हणजे बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर खड्डे खोदण्यात आले आहे. यामुळे दररोज वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. महानगर पालिका आणि नासुप्र तर्फे विकास कामांमध्ये भेदभाव करण्यात येते. (Nagpur administation) उत्तर नागपुरात विकास कामांकरिता निधीचीतरतूद देखील करण्यात आली नाही. ज्यामुळे आजच्या पावसाने शहरातील रस्तेही पाण्याखाली आल्याचे दिसून आले.