आढावा बैठकीसाठी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आ. राजू नवघरेंचे आवाहन
वसमत (Sunil Tatkare) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे हिंगोली जिल्हा दौर्यावर येणार आहेत. प्रदेशाध्यक्ष या नात्याने सुनील तटकरे पहिल्यांदाच हिंगोली जिल्हा दौर्यावर येणार आहेत. या दौर्यात त्यांचे भव्य दिव्य स्वागत केले जाणार आहे. त्यांच्या उपस्थित होणार्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता आढावा बैठकीसाठी कार्यकर्ते पदाधिकार्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पाटील नवघरे यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या उपस्थितीत १९ जुलै रोजी हिंगोली येथील महावीर भवन येथे सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर (Rupali Chakankar) , पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता पदाधिकार्यांच्या आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर वसमत विधानसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आढावा बैठकीसाठी जाणार आहेत.
आढावा बैठकी साठी व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे पहिल्यांदाच हिंगोली जिल्ह्यात येत असल्याने त्यांच्या स्वागताच्या तयारीसाठी वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आमदार राजू पाटील नवघरे यांच्या सूचनेनुसार घेण्यात आलेल्या या बैठकीला या बैठकीला राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळूमामा ढोरे यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रदेशाध्यक्ष हिंगोली जिल्ह्यात पहिल्यांदाच येत असल्यानेत्यांचे भव्य दिव्य स्वागत करण्याचे नियोजन वसमत येथील बैठकीत करण्यात आले.
वसमत विधानसभा मतदारसंघातून प्रत्येक सर्कलमधून वसमत शहरातील प्रत्येक प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांनी कार्यकर्त्यांना घेऊन मेळाव्यासाठी यावे असे या बैठकीत सांगण्यात आले. वसमत विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त कार्यकर्ते आढावा बैठकासाठी राहतील यासाठी आमदार राजू पाटील नवघरे (MLA Raju Patil Navghare) व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. त्यामुळे हा मेळावा भव्य दिव्य होईल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचे जंगी स्वागत होईल, असे नियोजन करण्यात आलेले आहे.
इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साह संचारला
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेणार असल्याने या बैठकीत निवडणुकीचे नियोजन ठरणार असे गृहीत धरले जात आहे त्यामुळे नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तयारी करत असलेले इच्छुक उमेदवार यांच्यात उत्साह संचारला आहे.
सर्व इच्छुक उमेदवार सर्व शक्तीनिशी कार्यकर्त्या घेऊन आढावा बैठकीसाठी जाणार असल्याचे एकंदरीत चित्र पहावयास मिळत आहे इच्छुकांची गर्दी राष्ट्रवादी काँग्रेसकडे मोठी असल्याने प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत होणारी आढावा बैठक भव्य दिव्य होईल असे चित्र निर्माण झाले आहे. आपली उमेदवारी पक्की व्हावी व प्रदेशाध्यक्षांच्या समोर आपण केलेल्या कार्याचा आढावा मांडावा यासाठी इच्छुक पदाधिकारी आजी माजी भावी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य तयारी करत आहेत.